Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Karnatak Election : कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी मतदानाला सुरुवात

Karnatak Election : कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी मतदानाला सुरुवात

Subscribe

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा मतदानाला (Karnatak Election) आज (10 मे) सकाळी 7 वाजता सुरूवात झाली असून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सर्व 224 मतदार संघासाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक कर्मचारी नियोजित मतदान केंद्रावर मंगळवारीच पोहचले होते. एकूण 2,615 उमेदवारांचे राजकीय भविष्य 5.31 कोटी मतदार या विधानसभा निवडणुकीत ठरणार आहेत. काही मतदारसंघ संवेदनशील असल्यामुळे या निवडणुकीसाठी तब्बल दोन लाखांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

कर्नाटकमधील विधानसभेच्या सर्व 224 जागांसाठी आज मतदान होत आहे. निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. यावेळी निवडणूक लढविणाऱ्यांमध्ये अनेक मोठे नेते आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई स्वतः निवडणूक लढवत आहेत. याशिवाय, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार, जेडीएस प्रमुख एचडी कुमारस्वामी, जगदीश शेट्टर, केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, लक्ष्मण सवदी, रमेश जारकीहोळी, प्रियांका खर्गे, कृष्ण बैरेगौडा, रमेशकुमार यांच्यासह अनेक दिग्गज रिंगणात आहेत, तर माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा पहिल्यादांच निवडणुकीच्या रिंगणात नाहीत, तर भाजपचे अनेक बंडखोर नेते पक्ष बदलून पहिल्यांदा रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून ते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी जोरदार प्रचार केला आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात 18 मतदार संघांपैकी कुडची, रायबाग अनुसूचित जाती, तर यमकनमर्डी अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत, तर इतर मतदार संघ खुल्या गटासाठी राखीव आहेत. 18 मतदार संघात एकूण 187 उमेदवार रिंगणात उतरले असून यापैकी 174 पुरुष आणि 13 महिला आहेत. हवामान विभागाने तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवल्यामुळे प्रशासनाने गळके मतदान केंद्र आणि कौलारू मतदान केंद्र ताडपत्रीने झाकले आहे. मतदान प्रक्रियेसाठी एकूण 21 हजार 688 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून त्यापैकी 576 कर्मचारी मायक्रो ऑपझरर्व्हर म्हणून काम करणार आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -