घरदेश-विदेशKarntaka Exit Poll: कर्नाटकात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष तर भाजप दुसऱ्या स्थानी...

Karntaka Exit Poll: कर्नाटकात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष तर भाजप दुसऱ्या स्थानी…

Subscribe

6 पैकी 5 एक्झिट पोलमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरण्याची अपेक्षा आहे. त्याचवेळी एका एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळताना दिसत आहे.

कर्नाटकमध्ये विधानसभेच्या 224 जागांसाठी मतदान झाले आहे. आता 13 मे रोजी निकाल लागणार आहे. कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी 113 जागांची गरज आहे. दरम्यान, लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. या दक्षिणेकडील राज्यात कोणाचं सरकार स्थापन होणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. कर्नाटकच्या खुर्चीचा राजा कोण होणार आणि निवडणुकीच्या रिंगणात कोण बाजी मारणार. या प्रश्नांबाबत वेगवेगळ्या एक्झिट पोलचे निकाल आले आहेत. यातून यावेळी कर्नाटकात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात हे समजू शकते. 6 पैकी 5 एक्झिट पोलमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरण्याची अपेक्षा आहे. त्याचवेळी एका एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळताना दिसत आहे. जाणून घेऊया कोणत्या एक्झिट पोलमध्ये कोणत्या पक्षाच्या खात्यात किती जागा जात आहेत. ( Karnataka Exit Poll Congress is the largest party in Karnataka and BJP is the second know the various Exit Poll )

इंडिया टुडे – अॅक्सिस माय इंडिया

भाजप – 62 ते 80 जागा
काँग्रेस – 122 ते 140 जागा
जेडीएस – 20 ते 25 जागा
इतर – 0 ते 3

- Advertisement -

c-वोटर

भाजप – 83 ते 95 जागा
काँग्रेस – 100 ते 112 जागा
जेडीएस – 21 ते 29 जागा
इतर – 2 ते 6 जागा

- Advertisement -

पोलस्ट्रॅट

भाजप – 88 ते 98 जागा
काँग्रेस – 99 ते 109 जागा
जेडीएस – 21 ते 26 जागा
इतर – 0 ते 4 जागा

भाजपला 38 वर्षांचा ट्रेंड मोडायचा आहे

कर्नाटकातील सत्ताधारी भाजपला दर 5 वर्षांनी सत्ता बदलण्याची 38 वर्षे जुनी प्रवृत्ती मोडायची आहे, तर काँग्रेस यावेळी भाजपला सत्तेतून हटवण्याचा दावा करत आहे. जेडीएसला आशा आहे की 2018 प्रमाणेच पक्ष पुन्हा एकदा किंग मेकरच्या भूमिकेत येऊ शकतो. यावेळी निवडणुकीच्या प्रचारात सर्वच राजकीय पक्षांनी आपली पूर्ण ताकद लावली होती.

( हेही वाचा: सत्तासंघर्षाच्या निकाल आधीच मुख्यमंत्री राजीनामा देणार का? उपमुख्यमंत्री म्हणाले… )

204 जागांसाठी 2615 उमेदवार रिंगणात आहेत

राज्यातील 224 विधानसभा जागांसाठी 2 हजार 615 उमेदवार रिंगणात आहेत. सत्ताधारी भाजपने सर्व 224 विधानसभा जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. विरोधी काँग्रेस पक्षाने 223 उमेदवार उभे केले आहेत. मेळुकोट जागेसाठी काँग्रेसने उमेदवार दिलेला नाही. दुसरीकडे, JDS पक्षाने किंगमेकर बनण्याच्या आशेने 207 उमेदवार उभे केले आहेत तर आम आदमी पार्टी (AAP) ने 209 जागांवर निवडणूक लढवली आहे. बसपाने राज्यात 133 जागा लढवल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -