घरक्राइमदुसऱ्या पत्नीला पहिल्या लग्नाबद्दल कळाले; पतीने चाकूने २३ वेळा केले सपासप वार

दुसऱ्या पत्नीला पहिल्या लग्नाबद्दल कळाले; पतीने चाकूने २३ वेळा केले सपासप वार

Subscribe

पहिले लग्न झाल्याची पोलखोल झाल्यानंतर दुसऱ्या पत्नीने तलाक करण्यासाठी कोर्टात धाव घेतली होती. पण तिच्या याचिकेवर सुनावणी होण्यापूर्वीच पतीने पत्नीवर २३ वेळा चाकूने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कर्नाटकच्या गडगमधील पतीची ही क्रूरता समोर आली आहे. गंभीर महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.

२०१८मध्ये झाले होता प्रेमविवाह

पीडित महिलेची ओळख अपूर्वा पुराणिक अशी आहे, जी हुबळीमध्ये एमबीएचे शिक्षण घेत होती. यादरम्यान तिला ऑटो रिक्षा चालक एजाजवर प्रेम झाले. त्यानंतर २०१८मध्ये कुटुंबाच्या विरोधात जाऊन दोघांनी लग्न केले. लग्नानंतर एजाजने अपूर्वाचे नाव बदलून अरफा बानो करवा ठेवले. दोघांना एक मुलगा आहे, जो दोन वर्षांचा आहे.

- Advertisement -

पती पूर्वीपासून होता लग्नबंधनात

६ महिन्यांपूर्वी अपूर्वाला समजले की, एजाजचे पूर्वीच लग्न झाले होते. यामुळे दोघांमध्ये भांडण होऊ लागली. मग त्यानंतर अपूर्वाने तलाकसाठी याचिका दाखल केली. यावर लवकरच कोर्टात सुनावणी होणार होती. परंतु सुनावणी पूर्वी एजाजने पत्नीवर हल्ला केला.

पोलिसांचा तपास सुरू

सध्या पोलिसांनी आरोपी पती एजाजला अटक केली आहे आणि याप्रकरणाचा तपास केला जात आहे. तर दुसरीकडे काही लोकं हे प्रकरण लव जिहादसोबत जोडत आहे. याबाबत काही संघटनांनी लव जिहाद अंतर्गत प्रकरणाची सुनावणीची मागणी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा- सासू-सून, दीड वर्षाच्या मुलाला चिकटपट्टीने बांधून ठेवत दागिने, २ लाख रुपये लंपास


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -