घरताज्या घडामोडीHijab Row: 'शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य', कर्नाटक हायकोर्टाने हिजाब वादाची याचिका...

Hijab Row: ‘शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य’, कर्नाटक हायकोर्टाने हिजाब वादाची याचिका फेटाळली

Subscribe

आज हिजाब वादाप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी असल्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये १४४ कलम लागू करण्यात आला होता, जेणेकरून कोणताही अनर्थ घडू नये.

गेल्या काही महिन्यांपासून देशभरात सुरू असलेल्या हिजाब वादासंदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयाने मोठा निकाला दिला आहे. याप्रकरणी सुनावणी देत कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाब मुस्लिम धर्माचा अनिवार्य भाग नाही आणि शाळकरी विद्यार्थीनी शालेय गणवेश घालण्यासाठी नकार देऊ शकत नाही. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य असल्याचे स्पष्ट करत मुस्लिम विद्यार्थीनींनी शाळा, कॉलेजमध्ये हिजाब घालण्यास परवानगी देण्याची याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या सुनावणीपूर्वी आज कर्नाटकच्या काही जिल्ह्यांमध्ये १४४ कलम लागू करण्यात आला होता, जेणेकरून कोणतीही हिंसा उफाळून येऊ नये.

- Advertisement -

तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिला निकाल

शाळा, कॉलेजमध्ये हिजाब घालण्याची परवानगी देण्याबाबतच्या याचिकेप्रकरणी ९ फेब्रुवारीला सरन्यायाधीश रितू राज अवस्थी, न्यायाधीश कृष्णा एस दीक्षित आणि न्यायाधीश जेएम खाजी यांच्या खंडपीठाची स्थापना केली होती.

कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली होती तैनात

कर्नाटक उच्च न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वी राज्यभरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. कोप्पल, गडग, कलबुर्गी, दावणगेरे, हासन, शिवमोगा, बेलगांव, चिक्कबल्लापूर, बेंगलुरू आणि धारवाडमध्ये १४४ कलम लागू केले. शिवमोगामध्ये शाळा, कॉलेज बंद केले होते. तर कर्नाटक उच्च न्यायालयातील जज यांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.

- Advertisement -

हिजाब वाद नेमका काय?

कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात जानेवारी महिन्यात हिजाब घालण्यावरून वाद सुरू झाला. उडुपी येथील कॉलेजमधील काही विद्यार्थींनींनी हिजाब घालून वर्गात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र त्यांना अडवण्यात आले. कॉलेज प्रशासनाने ड्रेसमध्ये समानता असावी, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले. पण यावरून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वाद वाढत गेला. याप्रकरणी विद्यार्थींनींनी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या हिजाब वादाचे पडसाद संपूर्ण देशभरात पाहायला मिळाले. काही शाळेत हिजाबच्या समर्थनार्थ आणि विरोध आंदोलन केले गेले. एवढेच नाही तर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले होते.


हेही वाचा- Hijab Row: हिजाब घातला नाही तर होतो बलात्कार; कर्नाटकच्या काँग्रेस नेत्याचे खळबळजनक विधान


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -