Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश निवडणुकीत उमेदवाराने संपत्ती जाहीर न केल्यास ठरणार अपात्र, 'या' न्यायालयाने दिला निर्णय

निवडणुकीत उमेदवाराने संपत्ती जाहीर न केल्यास ठरणार अपात्र, ‘या’ न्यायालयाने दिला निर्णय

Subscribe

कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात उमेदवारांनी निवडणुकीतील संपत्ती जाहीर न करणे ही भ्रष्ट प्रथा असल्याचे म्हटले आहे. तसेच, यामुळे उमेदवार हा अपात्र देखील ठरू शकतो, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

कर्नाटक : निवडणुकीला उभे राहिल्यानंतर उमेदवाराला त्याची संपत्ती निवडणूक आयोगासमोर जाहीर करणे हे बंधनकारक असते. परंतु काही उमेदवार हे खोटी संपत्ती जाहीर करून खऱ्या संपत्तीची आकडेवारी लपवतात. पण आता अशाच प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात उमेदवारांनी निवडणुकीतील संपत्ती जाहीर न करणे ही भ्रष्ट प्रथा असल्याचे म्हटले आहे. तसेच, यामुळे उमेदवार हा अपात्र देखील ठरू शकतो, असेही न्यायालयाने म्हटले आहे. त्यासोबत उमेदवाराला या पुढे त्याच्यासोबत घरातील इतर सदस्यांच्या नावावर असलेल्या संपत्तीची माहिती देखील जाहीर करावी लागणार आहे. (Karnataka High Court has ruled that a candidate will be disqualified if he does not declare his assets in election)

हेही वाचा – न्यायालयात महिलांसाठी ‘हे’ शब्द आता वापरले जाणार नाहीत; सर्वोच्च न्यायालयाने हँडबुक केलं जारी

- Advertisement -

कर्नाटक ग्राम स्वराज आणि पंचायत राज कायद्यांतर्गत संपत्ती जाहीर न करणाऱ्या उमेदवाराला पंचायत निवडणुकीत अपात्र ठरविण्यात येऊ शकते, असे देखील उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. एखाद्या उमेदवाराने संपत्ती जाहीर केली नाही तर तो किंवा ती उमेदवार निवडणुकीतून अपात्र ठरू शकतात आणि इतर कोणत्याही उमेदवाराच्या निवडणुकीच्या संभाव्यतेवर त्याचा विपरीत परिणाम होतो हे सिद्ध करण्याची गरज लागणार नाही,” असे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मोहम्मद इस्माईल नावाच्या एका व्यक्तीने अबिदा बेगम नावाच्या महिला उमेदवाराच्या निवडणुकीला आव्हान दिल्यानंतर तिने तिची आणि तिच्या पतीची संपत्ती उघड केली नसल्याच्या कारणावरून ट्रायल कोर्टाने हा आदेश दिला. याचिकाकर्ते इस्माईल यांनी असा युक्तिवाद केला होता की पंचायत राज कायद्याच्या कलम 19(1)(b) नुसार अबिदा बेगमच्या भ्रष्ट प्रथेचे प्रमाण ठरेल. मात्र, नंतर अबिदा बेगम यांनी कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला मोहम्मद इस्माईल यांनी दाखल केलेल्या याचिकेत उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यामुळे उमेदवार, उमेदवाराचा पती/पत्नी आणि इतर आश्रित सदस्यांनी संपत्ती जाहीर करावी, असे न्यायालयाकडून सुनावणीवेळी सांगितले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -