घरताज्या घडामोडीKarnataka Hijab Controversy:-आधी तुमचं घर सांभाळा, भारताने पाकिस्तानला सुनावले

Karnataka Hijab Controversy:-आधी तुमचं घर सांभाळा, भारताने पाकिस्तानला सुनावले

Subscribe

कर्नाटकमधील हिजाब प्रकरणाचे देशातच नाही तर परेदशातही तीव्र पडसाद उमटत आहेत. याचपार्श्वभूमीवर, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने इस्लामाबादस्थित भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांना बोलावून हिजाब प्रकरणावर चिंता व्यक्त केली. तसेच कर्नाटकमधील मु्स्लीम विद्यार्थीनींना हिजाब घालण्यास मनाई करण्यात आल्याची निंदा केली. यावर भारतीय दूतावासाचे अधिकारी सुरेश कुमार यांनी पाकिस्तानचे आरोप निराधार असून आधी आपल्या देशात काय सुरू आहे ते बघावं असे खडे बोलं संबंधितांना सुनावले आहेत.

भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश असून योग्य प्रक्रियेच्या अंतर्गत येथे काम होतात. पण त्याआधी पाकिस्तानने त्यांच्या येथे काय सुरू आहे याचाही रेकॉर्ड तपासावा असे सुनावत सुरेश कुमार यांनी पाकिस्तानला आरसाच दाखवला. त्यावर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात पाकिस्तानने भारतीय दूतावासाकडे कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या हिजाब प्रकरणाबदद्ल चिंता व्यक्त केल्याचे म्हटले आहे. तसेच कर्नाटकमध्ये आरएसएस आणि भाजपने संयुक्तपणे सुरू केलेल्या हिजाब विरोधी अभियानामुळे पाकिस्तान चिंतेत आहे. कारण हा मुस्लीम महिलांना अमानवीयपणे बहिष्करकृत करण्याचा बहुसंख्यांकाच्या अँजेडाचाच एक भाग असल्याचे या पत्रकात सांगण्यात आले आहे. तसेच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी एक टि्वट केले असून कर्नाटक हिजाबवरून भारत सरकारला लक्ष्य केलं आहे. मुस्लीम मुलींना शिक्षणापासून वंचित करुन त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणण्याचाच हा प्रकार आहे. यामुळे जगाला हे आता समजायला हवे की मुसलमानांना त्यांच्या हक्कापासून उपेक्षित ठेवण्याच्याच भारताच्या योजनेचाच हा एक भाग असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

- Advertisement -

तर पाकिस्तानची सामाजिक कार्यकर्ती नोबेल विजेती मलाला युसूफजाी हिने देखील भारत सरकारने मुस्लीम महिलांची उपेक्षा थांबवावी असे आवाहन केले आहे. यावर AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानला फटकारले असून हा माझा देश आहे . आम्ही काय ते बघून घेऊ तुम्हांला यात पडायची गरज असे पाकिस्तानला फटकारले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -