घरताज्या घडामोडीरेल्वे रुळावर आढळला कर्नाटक विधानपरिषदेचे उपसभापती धर्मेगौडा यांचा मृतदेह; आत्महत्येचा संशय

रेल्वे रुळावर आढळला कर्नाटक विधानपरिषदेचे उपसभापती धर्मेगौडा यांचा मृतदेह; आत्महत्येचा संशय

Subscribe

धर्मगौडा यांच्या मृतदेहाच्या शेजारी चिठ्ठी सापडली आहे.

कर्नाटकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्नाटक विधानपरिषदेचे उपसभापती आणि जेडीएसचे नेते एस. एल. धर्मेगौडा यांचं निधन झालं आहे. धर्मेगौडा यांचा मृतदेह रेल्वेरुळावर आढळा. आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांना धर्मेगौडा यांच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोट सापडली आहे. पोलीस धर्मेगौडा यांच्या आत्महत्येमागील कारण शोधत आहेत. १५ डिसेंबरला विधानपरिषदेमध्ये गोरक्षा कायद्यावरुन झालेल्या गोंधळा दरम्यान धर्मगौडा यांना धक्काबुक्की झाली होती. या घटनेनंतर धर्मगौडा यांना मोठा मानसिक धक्का बसल्याचं धर्मगौडा यांच्या कुटुंबाने पोलिसांना सांगितलं.

कर्नाटकमधील चिकमगलूर येथे एस.एल. धर्मेगौडा यांचा मृतदेह सापडला आहे. चिकमगलूर येथील कदूरजवळील रेल्वे रुळावर पोलिसांनी त्यांचा मृतदेह तसंच सुसाइड नोट जप्त केली आहे. पोलीस अद्याप या प्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास धर्मेगौडा यांचा मृतदेह आढळला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला.

- Advertisement -

६४ वर्षीय धर्मेगौडा हे कर्नाटक विधानपरिषदेत झालेल्या राड्यामुळे चर्चेत आले. धर्मेगौडांच्या मृत्यूमुळे कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांचे बंधू एसएल भोजेगौडाही विधानपरिषद आमदार आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचे ते निकटवर्तीय आहेत. “राज्याच्या विधान परिषदेचे उपसभापती आणि जेडीएस नेते एस एल धर्मेगौडा यांच्या आत्महत्येची बातमी धक्कादायक आहे. ते खूपच शांत आणि सभ्य नेते होते. यामुळे राज्याला मोठं नुकसानं झालं आहे,” अशी प्रतिक्रिया जेडीएस नेते एच डी देवेगौडा यांनी व्यक्त केली आहे.

गोहत्या प्रतिबंधक विधेयकावरुन सभागृहात गोंधळ

१५ डिसेंबरला विधानपरिषदेमध्ये गोरक्षा कायद्यावरुन झालेल्या गोंधळा दरम्यान धर्मगौडा यांना धक्काबुक्की झाली होती. ही घटना अभुतपूर्व होती. गोहत्या प्रतिबंधक विधेयक मंजूर झाले होते. त्यावेळी काँग्रेसने सभात्याग करत निषेध नोंदवला होता. त्यानंतर गोरक्षा कायद्यावरुन जोरदार राडा झाला होता. यावेळी काँग्रेसच्या आमदारांनी विधानपरिषेदच्या उपसभापतींना अक्षरश: सभागृहातून खेचून नेत बाहेर काढले. भाजप आणि जनता दलाने (सेक्युलर) असंवैधानिक पद्धतीने उपसभापतींना खुर्चीत बसवले. हा प्रकार दुर्दैवी आहे. काँग्रेसने त्यांना आसनावरुन खाली उतरायला सांगितले. ते अवैधरित्या सभापतींच्या आसनावर बसल्यामुळे आम्ही त्यांना सभागृहाबाहेर काढले, अशी प्रतिक्रिया काँग्रेस आमदार प्रकाश राठोड यांनी दिली होती.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -