घरक्राइमएका चॉकलेटने घेतला चिमुकलीचा बळी; चॉकलेट रॅपरसह गळ्यात अडकला

एका चॉकलेटने घेतला चिमुकलीचा बळी; चॉकलेट रॅपरसह गळ्यात अडकला

Subscribe

लहान मुलांना चॉकलेट आवडत असेल तरी हे चॉकेटल कधी जीवघेण ठरेल सांगता येत नाही. अशीच एक घटना कर्नाटकमधून समोर आली आहे. कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात बुधवारी एका 6 वर्षीय चिमुकलीचा चॉकलेट घशात अडकल्याने मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुकली ( समन्वी पुजारी) तिच्या घरी जात होती. यावेळी शाळेच्या बसमध्ये चढत असताना तिने चॉकलेट रॅपरसह गिळले, त्यामुळे तिचा मृत्यू झाला.

समन्वी मंगळवारी सकाळी शाळेत जाण्यास तयार नव्हती. यावेळी तिच्या आई, वडील आणि कुटुबियांनी तिला जाण्यासाठी कसेतरी पटवले, यावेळी चिमुकलीला आई सुप्रिता पुजारी यांनी समन्वीला एक चॉकलेट दिलं आहे. यावेळी शाळेची व्हॅन आली, हे पाहून समन्वीने रॅपरसह पटकन चॉकलेट खाल्ले. मात्र चॉकलेट रॅपरसह गिळल्याने गुदरमरून ती बसच्या दरवाजात बेशुद्ध पडली.

- Advertisement -

बसचा चालक आणि कुटुंबीयांनी समन्वीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, मात्र ती शुद्धीवर आलीच नाही. यावेळी कुटुंबियांनी तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मात्र रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे. समन्वीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मणिपाल केएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या बांदूर पोलिसांचे म्हणणे आहे की, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूमागचे नेमके कारण स्पष्ट होईल. त्याचवेळी समन्वीच्या मृत्यूनंतर शाळेने सुट्टी जाहीर केली. समन्वी ही विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी होती.


उठाव आणि बंड नव्हताच, ती गद्दारी अन् गद्दार म्हणूनच माथ्यावर शिक्का घेऊन फिरणार, आदित्य ठाकरेंचा घणाघात


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -