ठरलं! कर्नाटकला ‘या’ तारखेला मिळणार नवा मुख्यमंत्री; खर्गेंनी सोडवला तिढा

हायकमांडने सिद्धरमय्या आणि डीके शिवकुमार या दोन्ही नेत्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. त्यानंतर सिद्धरमय्या हेच कर्नाटकचे मुख्यमंत्री असतील असं स्पष्ट झालं. तसेच डीके शिवकुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची सुत्रं सोपवण्यात आली आहेत.

Karnataka will get a new Chief Minister on 20 th May Mallikarjun Kharge solved the problem
Karnataka will get a new Chief Minister on 20 th May Mallikarjun Kharge solved the problem

चार दिवसांच्या बैठकांच्या सत्रांनंतर अखेर सिद्धरमय्या यांच्याकडे कर्नाटकाच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. हायकमांडने सिद्धरमय्या आणि डीके शिवकुमार या दोन्ही नेत्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. त्यानंतर सिद्धरमय्या हेच कर्नाटकचे मुख्यमंत्री असतील असं स्पष्ट झालं. तसेच डीके शिवकुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची सुत्रं सोपवण्यात आली आहेत. राज्यात काँग्रेसला प्रचंड यश मिळाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता.  (Karnataka will get a new Chief Minister on 20 th May Mallikarjun Kharge solved the problem )

कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची आज सायंकाळी 7 वाजता बंगळुरु येथे बैठक पार पडणार आहे. आमदरांना या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत कळवण्यात आलं आहे. बुधवारी दिवसभर मल्लिकार्जुन खरगे यांचं नवी दिल्लीत बैठकांचं सत्र सुरु होतं, अखेर मध्यरात्री प्रश्न सोडवण्यात त्यांना यश आलं आहे. कर्नाटकमध्ये नव्या सरकारचा शपथविधी 20 मे रोजी होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

पक्षात अनेक बैठका झाल्या होत्या. खर्गे यांनी पक्षाच्या कार्यकारी नेत्यांशी चर्चा केल्या. त्यानंतर अखेरचा निर्णय घेतला. बुधवारी संध्याकाळी सिद्धरमय्या आणि डीके शिवकुमार यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. काँग्रेसने ट्वीटरवर या दोन्ही नेत्यांचे राहुल गांधींसोबतचे फोटो शेअर केले होते. त्यात डीके शिवकुमारच मुख्यमंत्री होणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, सिद्धरमय्या यांनी मुख्यमंत्री पदावरील दाव्यातून माघार घेण्यास नकार दिला होता.

दिवसभर झालेल्या या चर्चेंनंतर अडीच वर्षे मुख्यमंत्री पद विभागून घेण्याच्या मुद्यावरदेखील चर्चा झाली. मात्र, डीके शिवकुमार पहिल्या अडीच वर्षांसाठी आग्रही होते अशी माहिती होती, मात्र, अखेर रात्री उशिरा कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा पेच सोडवण्यात मल्लिकार्जुन खर्गे यांना यश आलं आहे. त्यामुळे आता लवकरच कर्नाटकला नवा मुख्यमंत्री मिळणार असल्याच्या चर्चा आहेत. सिद्धरमय्या यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

 

( हेही वाचा: हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष श्रीचंद परमानंद हिंदुजा यांचे निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास )