घरक्राइमकर्नाटकात बलात्काराच्या आरोपाखाली मुरुगा मठाचे महंत शिवमूर्ती शरनारू यांना अटक

कर्नाटकात बलात्काराच्या आरोपाखाली मुरुगा मठाचे महंत शिवमूर्ती शरनारू यांना अटक

Subscribe

मंगळवारी चित्रदुर्ग येथील जिल्हा सत्र न्यायालयाने मुरुगा मठाच्या मुख्य पुजाऱ्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 1 सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली.

कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील मुरुगा मठाचे महंत शिवमूर्ती मुरुघ शरनारू यांना बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरोधात दोन अल्पवयीन मुलींचे शोषण केल्याचे आरोप आहेत. या प्रकरणी शिवमूर्ती मुरुघ शरनारू यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपीला चित्रदुर्ग जिल्हा कारागृहात आणण्यात आले असून त्याला न्यायालयात हजर केले जाईल, यावेळी पोलिसांकडून त्याच्या कोठडीची मागणी केली जाईल. आरोपी महंत आणि त्यांच्या इतर चार साथादारांविरुद्ध पॉक्सो (POCSO), अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा आणि भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरून राज्यातही राजकारण तापले आहे.

मुरुगा शरनारू यांनी अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली होती. मात्र चित्रदुर्गाच्या न्यायालयाने आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणी गुरुवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. याप्रकरणी अधिक माहिती देत पोलिसांनी सांगितले की, विहित प्रक्रियेनुसार आरोपीला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. यासोबतच प्रक्रियेनुसार वैद्यकीय चाचणीही करण्यात आली आहे. मंगळवारी चित्रदुर्ग येथील जिल्हा सत्र न्यायालयाने मुरुगा मठाच्या मुख्य पुजाऱ्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 1 सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली.

- Advertisement -

या प्रकरणी विरोधकांकडून सरकावर हल्लाबोल केला जात आहे. सरकार या आरोपींबाबत मवाळ असल्याचा आरोप करून विरोधक याला निवडणुकीचा मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, वकिलांच्या एका गटाने रजिस्ट्रार जनरल, कर्नाटक उच्च न्यायालयाला पत्र लिहून म्हटले आहे की, आरोपींविरुद्ध निष्पक्ष तपास केला जात नाही. त्याची अद्याप वैद्यकीय तपासणीही झालेली नाही. या गोष्टींवरून तपास निष्पक्षपणे होत नसल्याचे दिसून येते. याप्रकरणी महंतांसह पाच जणांना आरोपी करण्यात आले आहे. दरम्यान जानेवारी 2019 ते जून 2022 या कालावधीत 15 आणि 16 वर्षांच्या दोन मुलींचा लैंगिक छळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

दरम्यान शरनारू हे कर्नाटक राज्यातील प्रमुख लिंगायत मठाचे महंत आहेत. त्यांचा मुरुगा मठ ही एक प्रभावी संस्था म्हणूनही ओळखली जाते. जिथे नित्यनेमाने भेट देणाऱ्या राजकारण्यांची लिस्ट मोठी आहे. महंतांनी राहुल गांधींनाही ‘लिंगदीक्षा’ दिली होची, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला लिंगायत पंथात सामील होण्यासाठी आमंत्रित केले जाते. यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाचे नेते डीके शिवकुमार आणि केसी वेणुगोपाल यांच्यासह चित्रदुर्गातील मुरुगा मठाला भेट दिली होती.

- Advertisement -

महिलांवर बलात्कार, लैंगिक छळ, गर्भपात अशा आरोपांखाली मुरुगा मठाचे महंत शिवमूर्ती शरनारू यांच्याप्रमाणे यापूर्वी वादग्रस्त अध्यात्मिक गुरू आसाराम बापू, बाबा राम रहीम, चंद्रास्वामी, नित्यानंद स्वामी, राजीव रंजन द्विवेदी उर्फ भीमानंद, स्वामी प्रेमानंद आदींविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मुंबादेवी महिला मारहाण प्रकरणी मनसेच्या तीन कार्यकर्त्यांना अटक

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -