करुणानिधी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी

तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे नेते मुथुवेल करुणानिधी यांचे पार्थिव बुधवारी सकाळी चेन्नईतील राजाजी हॉल येथे नेण्यात आले. राजाजी हॉल येथे कार्यकर्त्यांना पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार आहे.

karunanidhi dead: karunanidhi body for introspection

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष करुणानिधी यांचे मंगळवारी सायंकाळी निधन झाले. वयाच्या ९४ व्या वर्षी चेन्नईतील कावेरी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे नेते मुथुवेल करुणानिधी यांचे पार्थिव बुधवारी सकाळी चेन्नईतील राजाजी हॉल येथे नेण्यात आले. राजाजी हॉल येथे कार्यकर्त्यांना पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. शोकाकुल अवस्थेतील हजारो समर्थकांनी हॉलबाहेर रांगा लावल्या आहेत.

मंगळवारी रात्री त्यांचे पार्थिव गोपालपूरम येथील निवासस्थानी नेण्यात आले. त्यानंतर पहाटे चारच्या सुमारास करुणानिधी यांचे पार्थिव राजाजी हॉलमध्ये ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही सकाळी दहाच्या सुमारास अंत्यदर्शनासाठी चेन्नईत पोहोचणार आहेत. करुणानिधी यांच्या निधनानंतर तामिळनाडूत सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून तामिळनाडू सरकारने अंत्यसंस्कारांसाठी आज सुटी जाहीर केली आहे. करूणानिधी यांच्या निधनानंतर बुधवारी राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून तामिळनाडू सरकारनेही अंत्यसंस्कारांसाठी आज सुटी जाहीर केली आहे.

करुणानिधी यांच्या अंत्यविधी स्थळावरुन वाद

तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या अंत्यविधी स्थळावरुन सध्या वाद सुरु आहे. करुणानिधी यांच्या पार्थिवावर मरीना बीच येथे अंत्यसंस्कार करण्याला हायकोर्ट परवानगी देणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे करुणानिधी यांचे पार्थिव अंत्यविधीच्या प्रतिक्षेत आहे. करुणानिधी यांच्या स्मारकासाठी बीचवर जागा मिळावी अशी मागणी करण्यात आली असून राज्यातील अण्णा द्रमुक सरकारने ही मागणी फेटाळली आहे. अंत्यविधीला प्रतिक्षेत राहाव लागत असल्याने द्रमुक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तर सरकारने गांधीमंडप येथे दोन एकरच्या जागेत अंत्यविधीसाठी जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र या जागेस कुटुंबियानी आणि कार्यकर्त्यांनी नकार दिला आहे.