Homeदेश-विदेशNew Name for Kashmir : आता काश्मीरचं नावही बदलणार...केंद्रीय गृहमंत्री अमित शहा...

New Name for Kashmir : आता काश्मीरचं नावही बदलणार…केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले संकेत

Subscribe

कलम 370 रद्द करून केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केल. त्यानंतर 10 वर्षांनी पहिल्यांदाच काश्मीरमध्ये निवडणुका देखील झाल्या. आता केंद्र सरकार काश्मीरचं नावच बदलण्याच्या विचारात आहे.

नवी दिल्ली : कलम 370 रद्द करून केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केल. त्यानंतर 10 वर्षांनी पहिल्यांदाच काश्मीरमध्ये निवडणुका देखील झाल्या. आता केंद्र सरकार काश्मीरचं नावच बदलण्याच्या विचारात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात याचे संकेत दिले आहेत. (kashmir could be named as kashyap central home minister amit shah hints)

J&K आणि लडाख थ्रू द एजेस या पुस्तकाचे प्रकाशन करताना अमित शहा बोलत होते. तेव्हा ते म्हणाले की, काश्मीरचं नाव कश्यप असं होऊ शकतं. काश्मीर हा देशाचा असा भाग आहे, जिथे भारताची दहा हजार वर्षे जुनी संस्कृती आहे. कश्यप यांच्या नावानेच काश्मीरची स्थापना झाल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

भारताची संस्कृती समजून घेण्यासाठी आपल्याला देशाची संस्कृती तसेच परस्परांना जोडणारी भावना समजून घ्यावी लागेल. प्राचीन ग्रंथांमध्ये काश्मीर आणि झेलमचा उल्लेख असताना काश्मीर कोणाचे आहे, असा प्रश्न उपस्थित होऊच शकत नसल्याचेही ते म्हणाले. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील असेही अमित शाह यांनी ठणकावून सांगितले. कोणताही कायदा काश्मीरला भारतापासून वेगळे करू शकत नाही. या पुस्तकात जम्मू-काश्मीर आणि लडाखचा इतिहास, संस्कृती आणि महत्त्व तपशीलवार चित्रण करण्यात आले आहे.

हेही वाचा – Hindu in Bangladesh : हिंदू संत चिन्मय दास यांचा जामीन अर्ज फेटाळला; अपिलात जाण्याचा निर्णय

- Advertisement -

काश्मीरमध्ये जी मंदिरं मिळाली आहेत, त्यांचा उल्लेख पुस्तकामध्ये आहे, त्यामधून काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे दर्शवते. लडाखमध्ये तोडण्यात आलेली मंदिरं, काश्मीरमध्ये संस्कृत भाषेचा होत असलेला वापर, काश्मीरमध्ये स्वातंत्र्यानंतर झालेल्या चुका या सर्वांचा उल्लेख या पुस्तकात आहे, असेही अमित शाह यांनी सांगितले.

अमित शहा पुढे म्हणाले की, कलम 370 नेच काश्मिरी तरुणांमध्ये फुटीरतावादाची बिजे रोवली. कलम 370 ने भारत आणि काश्मीरमधील एकोप्याला तोडलं. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात दहशतवाद वाढीस लागला. मात्र आता कलम 370 हटवण्यात आल्यानंतर काश्मीरमधील दहशतवादी कारवाया घटल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा – Lalu Prasad Yadav : नितीश कुमारांसाठी आमचे दरवाजे…, आदित्य ठाकरेंपाठोपाठ लालू प्रसादांचे सूचक विधान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -