घरताज्या घडामोडी'या' राज्यात वृत्तपत्रासह फ्रीमध्ये दिला जातोय मास्क

‘या’ राज्यात वृत्तपत्रासह फ्रीमध्ये दिला जातोय मास्क

Subscribe

सध्या सोशल मीडियावर या वृत्तपत्राचे कौतुक केले जात आहे.

कोरोना विषाणूपासून बचाव करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सावधगिरी बाळगणे आहे. या विषाणूपासून बचाव करण्यासाठी एकमेकांमध्ये दोन मीटर अंतर आणि मास्क घालणे आवश्यक आहे. त्यामुळे याबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने मोहिम राबवली जात आहे. अशी एक अनोखी मोहिम काश्मीरच्या उर्दू वृत्तपत्राने राबवली आहे. यामुळे या वृत्तपत्राचे खूप कौतुक होत आहे. या स्थानिक उर्दू वृत्तपत्राचे नाव ‘रोशनी’ असं आहे. या उर्दू वृत्तपत्राने आपल्या वाचकांना मास्क घालण्याचे आवाहन करण्यासाठी हा अनोखा मार्ग अवलंबला आहे.

कोरोनाच्या काळात वृत्तपत्र घरोघरी पोहोचवणे कठीण झाले होते आणि भीतीपोटी कोणी वृत्तपत्र खरेदी देखील करत नव्हते. अशामध्येच ‘रोशनी’ वृत्तपत्राने आपल्या वाचकांना मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. शिवाय या वृत्तपत्रासोबर मास्क देखील लोकांपर्यंत पोहोचवला जात आहे.

- Advertisement -

मंगळवारी जेव्हा या वृत्तपत्रासोबत मास्क लोकांचा घरी पोहचला तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. एका पानावर उजव्या बाजूला उर्दू भाषेत लिहिले होते की, ‘मास्क वापरणे आवश्यक आहे.’ या वृत्तपत्राचे संपादक जहूरा शोरा म्हणाले की, ‘आम्हाला आता हा संदेश लोकांपर्यत पोहोचवणे फार महत्त्वाचे वाटले आणि लोकांना मास्क घालणे हे समजवण्यासाठी एक चांगला मार्ग आहे.’ सध्या सोशल मीडियावर या वृत्तपत्राचे कौतुक केले जात आहे. श्रीनगरचे रहिवासी जुबैर अहमद म्हणाले की, ‘दोन रुपयांमध्ये वृत्तपत्रासह मास्क देणे ही खूप चांगली गोष्ट आहे. वृत्तपत्र हे लोकांना जागरूक करते हे या वृत्तपत्राच्या मार्फत कळते. म्हणून या वृत्तपत्राचे कौतुक केले पाहिजे.’

- Advertisement -

हेही वाचा – भारताच्या ताफ्यात P -8I विमानाचा समावेश, पाणबुडीचा अचूक वेध घेण्याची क्षमता!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -