घरदेश-विदेशजम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा टार्गेट किलिंगची घटना; दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडिताची हत्या

जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा टार्गेट किलिंगची घटना; दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडिताची हत्या

Subscribe

जम्मू-काश्मीरमधील शोपियानमधील चौधरी गुंड येथे शनिवारी पुन्हा एकदा टार्गेट किलिंगची घटना घडली आहे. दहशतवाद्यांनी एका नागरिकावर गोळ्या झाडल्या, ज्यात तो व्यक्ती गंभीर जखमी झाला. मात्र रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरु आहे. दहशतवाद्यांनी अन्य कोणावर हल्ला केला नाही का याची खातरजमा केली जात आहे. दहशतवाद्यांनी पूरण कृष्ण भट या नागरिकावर (अल्पसंख्याक) अचानक गोळीबार केला. या घटनेनंतर जम्मू काश्मीर पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकाबंदी केल्याची माहिती समोर येत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पूरण कृष्णा भट हा व्यक्ती याच भागातील रहिवासी आहे. शनिवारी ते आपल्या बागेकडे जात असताना लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी अचानक त्यांच्यावर गोळीबार केला. गोळी लागल्याने ते गंभीररित्या जखमी झाले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांना त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हल्लेखोरांना पकडण्यासाठी परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे.

- Advertisement -

काश्मीरमध्ये सातत्याने काश्मिरी पंडित आणि स्थलांतरित मजुरांना लक्ष्य केले जात आहे. 16 ऑगस्ट रोजी शोपियानमध्ये आणखी एक काश्मिरी पंडित सुनील कुमार भट यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. तर त्यांचा भाऊ पिंटू या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. या घटनेच्या वेळी दोन्ही भाऊ शोपियानमधील छोटोपोरा भागातील त्यांच्या सफरचंदाच्या बागेत काम करत होते. या घटनेपूर्वी या वर्षी अनेक स्थलांतरित मजुरांनाही दहशतवाद्यांनी आपले बळी बनवले होते.


जी. एन. साईबाबा प्रकरणात हायकोर्टाच्या निर्णयाला सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -