घरCORONA UPDATEकोरोनाग्रस्तांसाठी एकत्र आले काश्मिरी पंडीत आणि काश्मिरी मुस्लिम, रुग्णांसाठी करतात प्लाझ्माची मदत

कोरोनाग्रस्तांसाठी एकत्र आले काश्मिरी पंडीत आणि काश्मिरी मुस्लिम, रुग्णांसाठी करतात प्लाझ्माची मदत

Subscribe

ट्विटर हँडल सुरु केल्यापासून रोज सुमारे १५० हून अधिक प्लाझ्मा मॅच करुन रुग्णांची मदत केली आहे.

देशभरात कोरोनाचे थैमान सुरु आहे. ऑक्सिजन, इंजेक्शनप्रमाणेच कोरोना रुग्ण बरे होण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात आहे. मात्र देशात प्लाझ्माचा तुटवडा आहे. त्यामुळे बऱ्याचदा कोरोनातून बरे झालेल्यांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. रुग्णसंख्या वाढणाऱ्या जिल्ह्यात प्लाझ्माची गरज आहे. दिल्लीतील कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी काश्मिरी पंडीत आणि काश्मिरी मुस्लिम एकत्र आले आहेत. संजय रैना आणि अदनान शहा असे या दोघांचे नाव आहे. दोघांनी १८ एप्रिल रोजी कोरोनोग्रस्तांच्या मदतीसाठी @PlasmaNCR नावाचे ट्विटर हँडल सुरु केले. प्लाझ्मा थेरपीसाठी विनंती करणाऱ्या लोकांना दोघे आपल्या ट्विटर हँडलच्या मदतीने प्लाझ्मा मिळवून देण्यासाठी मदत करतात. प्लाझ्मा मिळेपर्यंत ट्विटर हँडलवरुन प्लाझ्मासाठी दोघेही प्रयत्न करत असतात.

संजय रैना हा दिल्लीतील एक अन्न व्यापारी आहे. तर १९ वर्षीय अदनान शाह हा दिल्लीत पत्रकारितेचे शिक्षण घेणारा विद्यार्थी आहे. शाह हा पत्रकारितेच्या शिक्षणासाठी दिल्लीत राहतो. त्याचे मुळ गाव हे काश्मीरमधील कुपवडा येथील आहे. रैना आणि शहा यांनी ट्विटर हँडल सुरु केल्यापासून रोज सुमारे १५० हून अधिक प्लाझ्मा मॅच करुन रुग्णांची मदत केली आहे.  त्यांच्याकडे रोज दिल्ली NCR,आग्रा,मेरठ,चंदीगड आणि काश्मीरमधील काही शहरांमधून २५० ते ३०० प्लाझ्मा रिकवेस्ट येतात.  एप्रिलमहिन्यात दिल्लीत कोरोनाचा कहर वाढला होता. त्यावेळी एका काश्मीरी मित्राला रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी दोघे एकत्र आले होते. कोरोनाची परिस्थिती पाहता या आपत्तीमध्ये लोकांना प्लाझ्मासाठी मदत करण्याचे ठरवले.

- Advertisement -

रैना आणि शहा यांच्या @PlazmaNCRया ट्विटवर हँडलवर प्लाझ्मा विनंतीसाठी रुग्णाचे नाव,वय,रक्तगट,फोन नंबर, योग्य पत्ता ही सर्व माहिती देण्यात येते. रैना आणि शहा सांगतात आमच्याकडे ट्विटरशिवाय काहीच नाही. आम्ही पूर्णपणे ट्विटरवर अवलंबून आहोत. आम्ही आमच्या नातेवाईकांकडून,शेजारी, मित्र,व्यावसायिकांच्या संपर्कात आहोत. त्यांची आम्ही एक यादी तयार करत आहोत. प्लाझ्मासाठी विनंत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. आम्ही रोज २० तास काम करतो. रोज मॅच होणारे प्लाझ्मा शोधणे कठीण काम आहे. कधी कधी आम्ही स्वत: प्लाझ्मा डिलिव्हरही करतो,असे रैना आणि शाह यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – कोरोना झाल्यानंतर शरीरात किती दिवस अँटीबॉडीज राहतात?; वैज्ञानिकांनी केला खुलासा

- Advertisement -

.

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -