घरदेश-विदेश'या' काश्मिरी तरुणाला उभं राहायचंय नरेंद्र मोदींच्या विरोधात

‘या’ काश्मिरी तरुणाला उभं राहायचंय नरेंद्र मोदींच्या विरोधात

Subscribe

एक काश्मिरी तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीला उभे राहणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नेरंद्र मोदी यांच्या विरोधात काश्मिरचा एक तरुण उभा राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. याच मतदारसंघातून एक काश्मीरी तरुण नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उभा राहणार आहे. या तरुणाचे नाव सज्जाद नूराबदी असे आहे.

…म्हणून मोदींविरोधात निवडणूक लढवतोय

३० वर्षीय सज्जाद नूराबदी हा पॉलिटिकल अॅक्टिविस्ट आहे. याअगोदर सज्जादने अनंदनाग या मतदारसंघातून पोटनिवडणुक लढवण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र, ती निवडणूकच रद्द झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आपण निवडणूक का लढवत आहोत? याचे कारण त्याने दिले आहे. मोदींनी काश्मिरी आणि मुस्लिमांची परिस्थिती भयानक बनवली आहे, हा संदेश भारतात पोहोचावा यासाठी निवडणुकीला उभे राहणार, असे सज्जाद नूराबदी याने सांगितलं आहे. त्याने स्वत:चा तहरीक-ए-इंसाफ नावाचा नवीन पक्ष बनवला होता. आगामी लोकसभा निवडणुकीत तो स्वत:च्या पक्षाकडून निवडणूक लढवणार की दुसऱ्या पक्षातून निवडणूक लढवणार, याबाबत प्रश्न विचारला असता त्याने सांगितलं की, ‘काही राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांशी तिकीटासंबंधीत माझं बोलणं सुरु आहे. तिकीट मिळालं तर ठिक आहे, नाहीतर मी स्वत:च्या ताकदीवर निवडणूक लढवेल.’

- Advertisement -

‘लोकांनी आम्हाला अतिरेकी समजू नये’

सज्जदला विश्वास आहे की, त्याला वाराणसीचे मतदार साथ देतील. यासंदर्भात बोलताना तो म्हणाला की, ‘मला विश्वास आहे की, वाराणसीमध्ये असे लोकं आहेत, जे माझं बोलणं समजून घेतील. मी केवळ खरं बोलतो. मी लोकांनी सांगेल की, मी काश्मिरी अॅलियन्स नाही आणि लोकांनी आम्हाला अतिरेकी समजू नये.’

फुटीरतावादी नेत्यांसोबत केले आहे काम

सज्जाद नूराबदीने वेगवेगळ्या फुटीरतावादी नेत्यांसोबत काम केले आहे. २०१४ मध्ये निवडणुकीच्या विरोधात अभियान चालवल्यामुळे त्याला अटक करण्यात आले होते. यासंदर्भात त्याने सांगितलं की, ‘निवडणुकीवर बहिष्कार करण्यासंदर्भात मी एक अभियान सुरु केलं होतं. या अभियानामुळे मला १५ दिवस कस्टडीमध्ये ठेवले होते.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -