घरदेश-विदेशक्वारंटाईन सेंटरमध्ये तरूणांची गांजा पार्टी; व्हिडीओ व्हायरल

क्वारंटाईन सेंटरमध्ये तरूणांची गांजा पार्टी; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे

कोरोना संदर्भात बिहारमधील स्थलांतरित मजुरांसाठी तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमधील काही फोटो लोकांचे लक्ष विचलित करत आहेत. क्वारंटाईनच्या नावाखाली मौजमजा करणाऱ्या मजुरांचे हे फोटो बिहारमधील कटिहारमधून समोर आले आहे. तेथील क्वारंटाईन सेंटर व्यसनाधीन व्यक्तींचे ठिकाण असल्याचे सांगितले जात आहे. सध्या या क्वारंटाईन सेंटरमध्ये काही लोकं गांजा ओढत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामुळे, कटिहारमधील क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यवस्थेच्या यंत्रणेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

कटिहार अहमदाबाद येथील बैरिया हायस्कूलमध्ये सध्या क्वारंटाईन सेंटर तयार करण्यात आले आहे. यासंदर्भात एक व्हिडीओ चांगला सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये क्वारंटाईन करण्यात आलेले लोकं मोठ्या आवाजात गाणी लावून भांग पित असल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान असे सांगितले जात आहे की, व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या गांजा ओढणाऱ्यांपैकी एक जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते शेख मुजफ्फर आलम यांच्या म्हणण्यानुसार, या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसणारे सर्व लोक एकाच गावातील असून ते बाहेरील गावावरून आल्याने त्यांना बैरिया येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. दरम्यान हे सर्व लोकं नियमांचे पालन करत नसून त्यापासून दूर राहतात तसेच क्वारंटाईन सेंटरबाहेर सतत ये-जा करताना दिसतात आता त्यांनी हद्द करत क्वारंटाईन सेंटरमध्ये गांजा पार्टी केल्याचे समोर आले आहे.


Video – क्वारंटाईन सेंटरमध्ये अश्लील डान्स, व्हिडिओ व्हायरल!

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -