घरदेश-विदेश'कौरवांचा जन्म टेस्ट ट्युब बेबीपासून'

‘कौरवांचा जन्म टेस्ट ट्युब बेबीपासून’

Subscribe

कौरवांचा जन्म हा टेस्ट ट्युब बेबीतून झाला होता. असं विधान प्रोफेसर नागेश्वर राव यांनी केलं आहे.

आंध्र युनिर्व्हसिटीचे व्हाईस चान्सलरांनी केलेल्या विधानावरून आता वाद होण्याची शक्यता आहे. कौरवांचा जन्म हा टेस्ट ट्युब बेबीतून झाला होता. असं विधान प्रोफेसर नागेश्वर राव यांनी केलं आहे. त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. इंडियन सायन्स काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी हे विधान केलं आहे. गांधारीनं १०० मुलांना अर्थात कौरवांना कसा जन्म दिला? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. शिवाय, प्रत्येकाला त्याबद्दल उत्सुकता देखील आहे. लोकांना असं वाटतं की कौरव हे काल्पनिक होते. पण, कौरवांचा जन्म हा टेस्ट ट्यूब बेबीपासून झाला होता असं प्रोफेसर नागेश्वर राव यांनी म्हटलं आहे. त्याला त्या काळा स्टीम सेल रिसर्च असं म्हटलं जायचं असं राव यांनी म्हटलं आहे.

स्टीम सेल रिसर्चबद्दल सर्वांना उत्सुकता आहे. हे प्रकरण नेमकं आहे तरी काय? पण, हजारो वर्षापूर्वी स्टीम सेल रिसर्चची पद्धत होती. त्यातूनच कौरवांचा जन्म झाला होता. असं नागेश्वर राव यांनी म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -