घरताज्या घडामोडीकझाकिस्तानमध्ये विमानाची मोठी दुर्घटना; नऊ जणांचा मृत्यू

कझाकिस्तानमध्ये विमानाची मोठी दुर्घटना; नऊ जणांचा मृत्यू

Subscribe

कझाकिस्तानमध्ये आज सकाळी विमानाची मोठी दुर्घटना झाली असून या अपघातग्रस्त विमानात एकूण १०० प्रवासी असल्याचे समोर येत आहे. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाल्याचे समोर आले आहे.
या विमानाने अलमाटी विमानतळावरुन उड्डाण केले होते. मात्र उड्डाणानंतर काही मिनिटात विमान जमीनदोस्त झाले. या अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

माहितीनुसार, उड्डाण करत असताना पायलटचे नियंत्रण सुटले आणि ते विमान संरक्षण भिंत तोडून एका इमारतीवर जाऊन आदळले. कझाकिस्तानची राजधानी नूर सुलतानच्या दिशेने हे विमान निघाले होते. सध्या आपत्कालीन यंत्रणा कामाला लागल्या असून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. तसंच विमानात अडकलेल्या प्रवाशांना सुखरुप बाहेर काढणाचा प्रयत्न देखील सुरू आहे.


हेही वाचा – महापालिका शाळांमधील टॅबचा वाद पुन्हा उफाळला

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -