Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी जय शिवशंकर! आता केदारनाथ मंदिर परिसरात भव्य 'ॐ' चेही दर्शन होणार

जय शिवशंकर! आता केदारनाथ मंदिर परिसरात भव्य ‘ॐ’ चेही दर्शन होणार

Subscribe

केदरनाथ मंदिराच्या चबुतऱ्यावर 50 टन वजनाचे 'ॐ' चिन्ह लावण्यात येणार आहे. हे 'ॐ' चिन्ह तांबे आणि पितळ यांचे मिश्रण करून तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे 'ॐ' चिन्ह बनवण्यासाठी जर्मनीतून तांबे आणि पितळाचे तुकडे आयात करण्यात आले होते. याबाबत सोमवारी माहिती देण्यात आली.

केदरनाथ मंदिराच्या चबुतऱ्यावर 50 टन वजनाचे ‘ॐ’ चिन्ह लावण्यात येणार आहे. हे ‘ॐ’ चिन्ह तांबे आणि पितळ यांचे मिश्रण करून तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे ‘ॐ’ चिन्ह बनवण्यासाठी जर्मनीतून तांबे आणि पितळाचे तुकडे आयात करण्यात आले होते. याबाबत सोमवारी माहिती देण्यात आली. (kedarnath dham 50 ton heavy om placed on platform front of temple at rudraprayag)

मिळालेल्या माहितीनुसार, दोन आठवड्यांत हे कार्य पूर्णत्वास नेले जाणार आहे. केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहात सोन्याचा मुलामा चढवल्यानंतर, मंदिरात सुवर्ण कलश आणि छत्र बसवण्यात आले होते. त्यानंतर आता धाममध्ये चबुतऱ्यावर 50 टन वजनाचे ‘ॐ’ चिन्ह बसवण्यात येणार आहे आणि त्यासाठीचे काम सुरू झाले आहे. ‘ॐ’ हे ५० टन वजनाचे चिन्ह ट्रॅक्टरच्या सहाय्याने केदारनाथ धामला नेण्यात आले.

- Advertisement -

डझनहून अधिक तुकड्या जोडून ते तयार करण्यात आले आहे. सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याची चाचणी घेण्यात आली. केदारनाथ मंदिरापासून 200 मीटर अंतरावर असलेल्या चबुतऱ्यावर ते चिन्ह बसवण्यात येणार आहे. तांबे आणि पितळ यांचे मिश्रण करून हे ‘ॐ’ चिन्ह तयार करण्यात आले आहे.

‘ॐ’ चे हे चिन्ह भक्तांना प्रेरणा देईल. ‘ॐ’ चिन्ह बसविण्याची चाचणी घेण्यात आली आहे, जी यशस्वी झाली. आता हे चिन्ह सुमारे दोन ते तीन आठवड्यांत लावले जाईल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र झिनकन यांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, केदारनाथ दुर्घटनेच्या 9 वर्षांनंतर भगवान शिवाचे उपासक गुरु ईशानेश्वर यांना निवासस्थान मिळणार आहे. त्यासाठीचे काम अंतिम टप्प्यात असून, या महिन्यात हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. नैसर्गिक आपत्तीनंतर मोकळ्या आकाशाखाली देवाच्या मूर्तींची पूजा केली जात आहे. ईशानेश्वर महादेवाची पूजा करण्यापूर्वी बाबा केदार यांना अन्नदान करण्याची परंपरा आहे. हे सुख-समृद्धी आणि वैभवाचेही प्रतीक मानले जाते. केदारनाथ धाममध्ये असलेले ईशानेश्वर मंदिर हे एक प्राचीन मंदिर आहे. जगप्रसिद्ध धाम केदारनाथ धामचे मंदिर पांडवांनी बांधल्याचे सांगितले जाते. आठव्या शतकात आदिगुरू शंकराचार्यांनी केदारनाथ मंदिराची पुनर्बांधणी आणि जीर्णोद्धार केला होता, पण केदारनाथ मंदिराच्या ईशान्य कोपर्‍यात केदारनाथ मंदिरापूर्वी केदारनाथचे गुरू ईशानेश्वर महादेव यांचे मंदिर बांधण्यात आले. ज्याप्रमाणे कोणत्याही घराचा पाया घालण्यापूर्वी ईशान्य दिशेला वास्तुपूजा केली जाते, त्याचप्रमाणे केदारनाथ मंदिराच्या उभारणीपूर्वी ईशानेश्वर महादेवाचे मंदिर ईशान्य कोपर्‍यात बांधले गेले होते.


हेही वाचा – लोकसभा निवडणुकीसाठी मविआच्या फॉर्म्युल्याबाबत जयंत पाटील यांनी दिली माहिती; म्हणाले…

- Advertisment -