Kedarnath Opening : अखेर दोन वर्षांनंतर केदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले, दर्शनासाठी मोठी गर्दी

kedarnath dham temple open exclusive baba mahadev temple opening videos
Kedarnath Opening : अखेर दोन वर्षांनंतर केदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले, दर्शनासाठी मोठी गर्दी

अखेर दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर केदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. आज सकाळी 6.25 वाजता वैदिक मंत्रोच्चाराने 12 ज्योतिर्लिंगांमध्ये विशेष स्थान असणाऱ्या केदारनाथ मंदिराचे दार उघडण्यात आले. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने पहिली पूजा करण्यात आली. मंदिराला 15 क्विंटल फुलांनी सजवण्यात आले होते.

केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडताच 10 हजारांहून अधिक भाविकांनी उपस्थिती दर्शवली. केदारनाथ मंदिर हे उत्तर आणि दक्षिण भारतातील धार्मिक संस्कृतीचा संगम मानला जातो. संपूर्ण केदारनाथ धाम हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे.

केदारनाथ चार धाम यात्रेला ३ मेपासून सुरुवात झाली आहे. यात गुरुवारी सकाळी गौरीकुंड येथून हजारो भाविक केदारनाथ मंदिराकडे रवाना झाले. भाविकांनी सुमारे 21 किमी अंतर पायी, घोडे, पिठूने पार केले. गुरुवारी सकाळी 6 वाजता सुरु झालेला प्रवास केदारनाथ धाम येथे सायंकाळी 4 वाजता संपला.

पहिल्याच दिवशी गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडण्यात आले. शुक्रवारी केदारनाथ धामचे दरवाजे उघडल्याने भाविक आणि यात्रेकरूंचा मोठा मुक्काम पूर्ण होणार आहे. 8 मे रोजी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडल्याने भाविकांना चार धामची यात्रा पूर्ण करता येणार आहे.