घरताज्या घडामोडीKedarnath Dham : महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांसाठी खुशखबर! केदारनाथ, बद्रिनाथ मंदिराचे या दिवशी उघडणार...

Kedarnath Dham : महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांसाठी खुशखबर! केदारनाथ, बद्रिनाथ मंदिराचे या दिवशी उघडणार दरवाजे

Subscribe

केदारनाथ धामच्या मंदिराचे दरवाजे पुढील दोन महिन्यांनंतर म्हणजेच ६ मे रोजी सकाळी ६.२५ वाजताच्या सुमारास उघडण्यात येणार आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी केदारनाथ धाम हे विशेष मानले जाते. तसेच हे मंदिर खूप प्राचीन आहे. महाशिवरात्रीदिवशी शिवभक्तांसाठी खुशखबर असून आज उखीमठ येथे पारंपारिक पद्धतीने पूजा करण्यात आली आणि पंचांग मोजल्यानंतर केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याचा मुहूर्त जाहीर करण्यात आला. महाशिवरात्रीनिमित्त ओंकारेश्वर मंदिरात सकाळी ७ वाजल्यापासून विशेष पूजेला सुरुवात झाली.

महाभारताचे युद्ध संपल्यानंतर हे ज्योतिर्लिंग पांडवांनी बांधले होते, असे मानले जाते. शिवरात्रीच्या पवित्र मुहूर्तावर केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याचा मुहूर्त जाहीर करण्यात आला असून श्री बद्रीनाथ- केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय, केदारनाथ रावल भीमाशंकर लिंग,आमदार मनोज रावत, मंदिर समितीचे उपाध्यक्ष किशोर पनवार,मंदिर समिती सदस्य श्रीनिवास पोस्ती, आशुतोष डिमरी, भास्कर डिमरी आणि इतर मंदिरातील समितीचे अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख जाहीर होताच उत्तराखंड चारधाम यात्रा २०२२ ची तयारीला सुरूवात झाली आहे. मंदिराचे दरवाजे उघडण्याची आणि बंद करण्याची एक विशेष प्रक्रिया आहे. टिहरी जिल्ह्यातील नरेंद्रनगर येथील राजदरबारात वसंत पंचमीला बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. गेल्या वर्षी २० नोव्हेंबरला बद्रीनाथ धामचे दरवाजे हिवाळा असल्यामुळे कायदेशीररीत्या बंद करण्यात आले होते. त्यानंतर या धाममध्ये जवळपास ४ हजार ३६६ भाविक उपस्थित होते.


हेही वाचा : Nitin Raut: वीज ग्राहकांसाठी विलासराव देशमुख अभय योजना जाहीर, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊतांची घोषणा

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -