घरदेश-विदेशकिराणा दुकान आणि फार्मसी स्टोअरीवरील निर्बंध हटवण्याचे केंद्राकडून राज्य सरकारला आदेश

किराणा दुकान आणि फार्मसी स्टोअरीवरील निर्बंध हटवण्याचे केंद्राकडून राज्य सरकारला आदेश

Subscribe

राज्यांमध्ये अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठ्यांची कमतरता भासू नये यासाठी किराणा दुकान, केमिस्ट, फार्मासिस्ट , किराणा गोदामांनावरील कलम १४४ निर्बंध हटवण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत. कित्येक राज्यांनी शनिवार आणि रविवारी रात्री विकेंड कर्फ्यू जाहिर केला आहे तर महाराष्ट्र सरकारने राज्यव्यापी कर्फ्यू लागू केला आहे. परंतु या निर्बंधांतून प्रत्येक राज्यांनी किराणा दुकान, आणि फार्मसी स्टोअरला हटवावे असे केंद्रीय मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव निधी खरे यांनी याबाबत राज्यांना पत्र लिहिले आहे.

केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने अन्न व ग्राहकविषयक बाबींसाठी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे. या पत्रात राज्यांनी अत्यावश्यक वस्तूंच्या किंमती वाढवू नयेत आणि नागरिकांना स्वस्त किंमतींमध्ये वस्तू उपलब्ध होतील याची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. तसेच कच्चा मालाच्या किंमती आणि वस्तूची विक्री किंमतींमधील चढउतार यावर लक्ष केंद्रीत करा, असे नमुद करण्यात आले आहे.

- Advertisement -

केंद्रीय अधिकाऱ्यांनी याबाबत बोलताना सांगितले की, राज्य सरकाराने कोरोना काळात आवश्यक गोष्टींवर लक्ष दिले पाहिजे. जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती स्थिर ठेवण्यासाठी वस्तूंची होणारी साठेबाजी रोखण्यासाठी योग्य ती पावले उचलावी यासाठी केंद्राच्या सल्लागार समितीचा सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे.

मागणीनुसार पुरवठा होण्यासाठी, वस्तुंची साठेबाजी रोखण्यासाठी तसेच जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने होणारी विक्री रोखण्यासाठी प्रत्येत राज्याने जिल्हा पातळीवर अन्न व नागरी पुरवठा, अन्न सुरक्षा नियंत्रक आणि पोलिसांची संयुक्त पथके तयार केली जाऊ शकतात, असे ते म्हणाले,

- Advertisement -

तसेच राज्यातील नागरिकांना वस्तुंच्या किंमती आणि त्यासंबंधीत अनेक घटकांबद्दल संभ्रम दूर करत अधिक जागरुक करण्यासाठी विविध ग्राहक जनजागृतीपर उपक्रम राबविण्याचे आवाहन राज्यांना केले आहे. जेणेकरून ग्राहकांना जीवनावश्याक वस्तूंची तात्काळ खरेदी करीता मदत होईल. तसेच ग्राहकांना तक्रार नोंदविण्यास ग्राहक हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्याच्या सुचना केंद्राने राज्यांना केल्या आहेत. जेणेकरुन आवश्यक वस्तुंच्या पुरवठ्याच्या उपलब्धतेसाठी संबंधित अधिकारी योग्य ती पावले उचलू शकतील.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -