Goa Assembly Election 2022: गोव्यात आपचा CM पदाचा चेहरा अमित पालेकर, केजरीवालांची घोषणा, कोण आहेत अमित पालेकर?

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदम पार्टीकडून मुख्यमंत्री पदाच्या नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यामध्ये अमित पालेकर यांची मुख्यमंत्री उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. अमित पालेकर वकिल आणि समाजसेवक आहे. अरविंद केजरीवाल यांचा हा मास्टर स्ट्रोक प्लान आहे. पालेकर भंडारी समाजातून असल्यामुळे केजरीवाल यांनी त्यांना मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी संधी दिली आहे. गोव्यामध्ये ३५ टक्के भंडारी समाज आहे. त्यामुळे या समाजाचा फायदा आम आदमी पार्टीला व्हावा, यासाठी केजरीवालांनी पालेकर यांच्याव्यतिरिक्त दुसऱ्या नावाचा विचारही केलेला नाहीये.

अमित पालेकर गोव्यामध्ये लोकप्रिय वकील आणि समाजसेवक आहेत. एखाद्या व्यक्तीला किंवा गोरगरिबांना मदत करण्यासाठी ते नेहमी पुढे असतात. तसेच त्यांनी भ्रष्टाचार विरोधात आवाज देखील उठवला आहे. पालेकर सांताक्रूझ परिसरात अधिक काळापासून राहतात. त्यांच्या आई दहा वर्षांसाठी सरपंच होत्या.

कोरोना काळात लोकांनी केली मदत

कोरोना काळात अमित पालेकरांनी लोकांनी खूप मदत केली आहे. स्थानिक रूग्णालयाला १३५ बेड्स त्यांनी दिले होते. रूग्णांवरील उपचार आणि लॉकडाऊनमध्ये अनेक लोकांनी त्यांनी मदत केली. मागील निवडणुकीत त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार देखील केला होता.

या कारणास्तव केलं उपोषण

अमित पालेकर यांनी जुन्या गोव्यातील हिरेटेज परिसरात अनधिकृत बांधण्यात येणाऱ्या बंगल्यांविरोधात उपोषण केलं होतं. उपोषणामुळे सरकारला नमते घ्यावे लागले. अमितच्या उपोषणादरम्यान अरविंद केजरीवाल यांनी पालेकरांची भेट घेतली होती.

दरम्यान, गोव्यामध्ये भंडारा समाज मोठ्या प्रमाणात आहे. ३० ते ४० टक्के लोकं आहेत. १९६१ मध्ये गोव्याला स्वातंत्र्य मिळालं होतं. त्यापासून आतापर्यंत ६० वर्षामध्ये एकच व्यक्ती दीड वर्षांसाठी मुख्यमंत्री झाला होता. त्यामुळे भंडारी समाजातून आता नव्या चेहऱ्याला संधी दिली जाणार आहे, असं केजरीवाल म्हणाले.


हेही वाचा : Vaibhavwadi Nagar Panchayat Election 2022 : वैभववाडीत नितेश राणेंचा एकहाती विजय, देवगड नगरपंचायत हातातून निसटली