Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश केजरीवाल आणि नितीश कुमार भेट; भाजपला पराभूत करण्याच्या डावपेचांवर चर्चा

केजरीवाल आणि नितीश कुमार भेट; भाजपला पराभूत करण्याच्या डावपेचांवर चर्चा

Subscribe

 

नवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची दिल्ली येथे भेट झाली. या भेटीत दिल्ली नोकरसेवा प्रकरणात केंद्र शासनाने जारी केलेल्या अध्यादेशावर चर्चा झाली. या अध्यादेशाला राज्यसभेत बहुमत मिळाले नाही तर ही भाजपच्या पराभवाची सुरुवात असेल, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला.

- Advertisement -

हा अध्यादेश राज्यसभेत मांडला जाणार आहे. त्याविरोधात सर्व विरोधक एकवटले तर तो अध्यादेश मंजूरच होणार नाही. ही एक प्रकारे भाजपच्या २०२४ च्या पराभवाची सुरुवात असेल. यासाठी विरोधकांनी एकत्र येऊन या अध्यादेशाविरोधात मतदान करायला हवे. नितीश कुमार यांचा पक्ष यासाठी आम्हाला मदत करेल, अशी अपेक्षा केजरीवाल यांनी व्यक्त केली.

केजरीवाल म्हणाले, मी नितीश कुमार यांचे आभार मानतो. ते आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आले आहेत. ते विरोधकांना एकत्र करण्याचे काम करत आहेत. नोकरभरतीचे सर्व अधिकार सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला दिले. केंद्र सरकारने आठच दिवसांत अध्यादेश जारी करत हे अधिकार संपुष्टात आणले. हा प्रकार असंविधानिक आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, केंद्र सरकार जे काही करत आहेत, ते अत्यंत चुकीचे आहे. जे अधिकार राज्य शासनाला दिले गेले आहेत ते काढून कसे घेतले जाऊ शकतात. असले प्रकार थांबवण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यायला हवे. आमचा केजरीवाल यांना पूर्णपणे पाठिंबा आहे.

यावेळी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवही नितीश कुमार यांच्या सोबत होते. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना केंद्र सरकार त्रास देत आहेत. आम्ही केजरीवाल यांना पाठिंबा देण्यासाठी आलो आहोत. कारण भाजप त्यांच्यावर अन्याय करत आहे. ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. संविधान बदलण्याची भाजपची ईच्छा आहे. आम्ही हे होऊ देणार नाही. आम्ही देशहितासाठी एकत्र काम करु, असे तेजस्वी यादव यांनी सांगितले.

केजरीवाल आणि नितीश कुमार यांची महिन्याभरातील दुसरी भेट आहे. नितीश कुमार हे सर्व विरोधकांना एकत्र करत आहेत. १२ एप्रिल २०२३ रोजी नितीश कुमार यांनी केजरीवाल यांची भेट घेतली होती.

- Advertisment -