घरदेश-विदेशKejriwal : आपण स्वतंत्र आणि निष्पक्ष लोकशाही आहोत हे..., आदित्य ठाकरेंचा मोदी...

Kejriwal : आपण स्वतंत्र आणि निष्पक्ष लोकशाही आहोत हे…, आदित्य ठाकरेंचा मोदी सरकारवर निशाणा

Subscribe

मुंबई : कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल, गुरुवारी सक्तवसुली संचालनालयाने (ED) अटक केली. ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अरविंद केजरीवाल यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याने याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. यापुढे आपल्याकडे स्वतंत्र आणि निष्पक्ष लोकशाही आहे, हे जगासमोर खोटे बोलायचे आहे का? असा बोचरा सवाल ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

हेही वाचा – Sharad Pawar : …याची किंमत मोजावी लागेल, केजरीवालांच्या अटकेवरून शरद पवारांनी भाजपाला सुनावले

- Advertisement -

मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ईडीने केजरीवाल यांना एकूण दहा समन्स बजावले होते, मात्र तरीही ते एकदाही ईडीसमोर हजर झाले नाहीत. अशातच, आपल्याला अटकेपासून संरक्षण मिळावे, अशी मागणी करणारी याचिका अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्‍च न्‍यायालयात केली होती. यावर गुरुवारी सुनावणी झाली. तथापि, केजरीवाल यांना कठोर कारवाईपासून कोणतेही संरक्षण देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्यानंतर काही तासांतच अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. तर, यापूर्वी 31 जानेवारीला कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली होती.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत मादी सरकारला लक्ष्य केले आहे. लोकशाही (democracy) ते कुचेष्टा (de-mockery) असा हा संपूर्ण व्यवस्थेचा प्रवास आहे. विरोधी आघाडीतील एका विद्यमान मुख्यमंत्र्यांना (अरविंद केजरीवाल) तुरुंगात टाकले, तर दुसऱ्या विद्यमान मुख्यमंत्र्यांनी (हेमंत सोरेन) अटक होण्यापूर्वी पदाचा राजीनामा दिला. याशिवाय, विरोधी पक्षाची खाती गोठवली, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Arvind Kejriwal: केजरीवालांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा की तुरुंगातून चालवणार सरकार; कायदा काय सांगतो?

महिनाभरापूर्वी झालेल्या महापौरपदाच्या निवडणूक प्रक्रियेत झालेली भयंकर गडबड कॅमेऱ्यात कैद झाली आहे, याची आठवण करून देत आदित्य ठाकरे म्हणाले की, अतिशय निर्लज्जपणे विरोधकांना विकत घेतले जात आहे किंवा सरकारी यंत्रणांद्वारे खच्चीकरण केले जात आहे. त्यामुळे यापुढे आपल्याकडे स्वतंत्र आणि निष्पक्ष लोकशाही आहे, असे जगासमोर खोटे बोलायचे आहे का? असा खोचक प्रश्नही त्यांनी केला आहे.

हेही वाचा – Rupali Chakankar : बारामतीतील कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याबाबत चाकणकरांचे स्पष्टीकरण, म्हणाल्या…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -