घरताज्या घडामोडीKerala Air India Crash: 'टेबलटॉप रनवे' म्हणजे काय?, या रनवेमुळे अपघात झाल्याचा...

Kerala Air India Crash: ‘टेबलटॉप रनवे’ म्हणजे काय?, या रनवेमुळे अपघात झाल्याचा अंदाज

Subscribe

या रनवेवर लँडिंग करताना किंवा उड्डाण करताना खूप खबदारी घ्यावी लागते.

केरळच्या कोझिकोडमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात दोन वैमानिकांसह १८ जणांचा मृत्यू झाला आहे. माहितीनुसार वंदे भारत मिशन अंतर्गत एअर इंडिया एक्स्प्रेसचे AXB1344, बोईंग ७३७ दुबईहून कोझिकोडकडे येत होते. या विमानात १८४ प्रवासी आणि २ वैमानिकांसह क्रूचे ६ सदस्य होते. हे विमान कोझिकोड येथे पोहोचले आणि रनवे पार करून भिंतीवर धडकले. त्यामध्ये विमानाचे दोन भाग झाले आणि दरीत कोसळले. अपघातानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर फायर टेंडर आणि रुग्णावाहिका बचावकार्यसाठी घटनास्थळी पोहोचले. हा अपघात कोणत्या कारणामुळे झाला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या अपघातामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. अनेकजण हा अपघात विमातळाचा रनवे ‘टेबलटॉप रनवे’ असल्यामुळे झाल्याचा अंदाज करत आहेत. पण हा ‘टेबलटॉप रनवे’ म्हणजे काय?

‘टेबलटॉप रनवे’ या शब्दातचा अर्थ दडलेला आहे. म्हणजेच टेबलटॉप रनवे एखाद्या पठारावर असतो. हा रनवे जिथे सुरू होतो आणि संपतो अशा दोन्ही बाजूंना दरीसारखा खोलगट भाग असतो. या रनवेच्या पुढे जास्त भाग नसतो. भारतात कोझिकोड विमानतळा व्यक्तिरिक्त मँगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मिझोरमामध्ये असलेले लेंगपुई विमानतळ येथे टेबलटॉप रनवे आहे. डोंगराळ भागात किंवा टेकडीच्या माथ्यावर टेबलटॉप रनवे असतात. त्यामुळे अनेकदा वैमानिकांना रनवे पठारावर नसून टेकडीखालच्या भागात जमिनीवगत असल्याचा भास होतो आणि यामुळेच अपघात होतात. या रनवेवर लँडिंग करताना किंवा उड्डाण करताना खूप खबदारी घ्यावी लागते.

- Advertisement -

परदेशात बऱ्याच ठिकाणी समांतर रनवे असतात. त्यामुळे तिथे विमान लँडिंग करताना फारशा समस्या उद्भवता नाही. भारतात मात्र समांतर रनवे जास्त प्रमाणात नाही आहेत. दरम्यान केरळच्या अपघातामध्ये विमानाच्या पुढील भागाच मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी ७.४५च्या सुमारास ही भीषण घटना घडली. तर एअर इंडिया एक्स्प्रेसच्या माहितीनुसार, कोझिकोडमधील करिपूर विमानतळावर विमान लँडिग करताना घसरले. या विमानामध्ये दोन वैमानिकांसह सहा क्रू मेंबर्स होते. तसेच १९१ प्रवाशी प्रवास करत होते, ज्यामध्ये १० मुलांचा समावेश होता.


हेही वाचा – केरळ विमान अपघात: दोन वैमानिकांसह १८ जणांचा मृत्यू!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -