Wednesday, May 5, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Kerala Assembly Election 2021: मेट्रो मॅन ई श्रीधरन यांच्या राजकीय करिअरचा आज...

Kerala Assembly Election 2021: मेट्रो मॅन ई श्रीधरन यांच्या राजकीय करिअरचा आज फैसला

Related Story

- Advertisement -

केरळ विधानसभा निवडणूक (Keral Assembly Election) येथे मतमोजणीला आज सकाळपासूनच सुरूवात झाली आहे. पल्लकड विधानसभा येथून निवडणूक लढवणारे भाजपचे उमेदवार ई श्रीधरन यांच्या राजकीय करिअरचा आजच्या मतमोजणीनंतर फैसला होणार आहे. तर सीपीआय(एम) चे सी पी प्रमोद, बीएसपीचे ई टी के वालसन, कॉंग्रेसचे शफी परमबिल आणि एसएफबीचे जयप्रकाश यासारख्या उमदेवारांचेही भवितव्य निश्चित होणार आहे. मेट्रो मॅन म्हणून ओळख असणाऱ्या ई श्रीधरन यांनी २०२१ मध्येच भाजप प्रवेश केला आहे. भाजपने ई श्रीधरन यांना २०२१ ची विधानसभा निवडणूक लढवण्याचे आवाहन केले होते.

केरळमध्ये मतमोजणीच्या निकालानुसार भाजपचा केरळमधील चेहरा असलेले मेट्रोमॅन ई श्रीधरन यांना केरळच्या पलक्कड येथून ६७५४ मतांची आघाडी मिळाली आहे. तर भाजपचे ४ उमेदवार याठिकाणी आघाडीवर आहेत. तर लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटचे मुख्यमंत्री असलेले पिनराई विजयन यांना ७१ जागांवर आघाडी मिळवली आहे. कॉंग्रेस आणि इतर सहयोगी पक्षही ५० जागांवर आघाडीवर आहेत.

- Advertisement -

दिल्ली मेट्रोला अनेक टप्प्यात यशाच्या शिखरावर पोहचवण्याचे काम ई श्रीधरन यांच्या नेतृत्वात झाले होते. दिल्लीच्या विकासाचे प्रतिक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. याआधीच पद्म श्री आणि पद्म विभूषण यासारख्या पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. दिल्ली मेट्रोतून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी कोची मेट्रो आणि लखनऊ मेट्रोच्या मुख्य सल्लागार पदाची जबाबदारी सांभाळली. त्यांनी याआधी जयपूर मेट्रोच्या सल्लागार पदीही काम केले आहे.

पलक्कड विधानसभेची जागा ही कोच्ची जिल्ह्यापैकी एक आहे. पल्लकड लोकसभा क्षेत्रात येणारी पल्लकड विधानसभा ही महत्वाची अशी जागा आहे. याआधी २०१६ मध्ये झालेल्या निवडणूकीत १ लाख ७८ हजार ३८७ मतदार याठिकाणी होते. त्यामध्ये ८६ हजार ६०६ पुरूष तर ९१ हजार ७८१ महिला मतदार होत्या. तर तृतीयपंथी मतदारांची संख्या ३५९ इतकी होती.

२०१६ मध्ये केरळ विधानसभेच्या निकालानंतरचे सरकार

- Advertisement -

२०१६ मध्ये केरळ विधानसभा निवडणुकीत एका टप्प्यात झालेल्या मतदानात एलडीएफने १४० जागांपैकी ९१ ठिकाणी विजय मिळवत सरकार स्थापन केले होते. कॉंग्रेसच्या नेतृत्वातील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला ४७ जागा मिळाल्या होत्या. तर राज्यात बहुमतासाठी आवश्यक असणाऱ्या ७१ जागा गरजेच्या होत्या. २०१६ च्या निवडणुकीत भाजपला १, सीपीआयला १९, सीपीआय (एम) ला ५८ आणि कॉंग्रेस २२ तर एनसीपीला २ जागा मिळाल्या होत्या. आईयूएमएल ला १८, जेडीएसला ३, केरळ कॉंग्रेस (एम) १ आणि इतर अशा ११ जागा निवडून आल्या होत्या.

 

- Advertisement -