घरक्राइमकेरळ नरबळी प्रकरण : मांसभक्षण केल्याची पोलिसांकडून पुष्टी नाही; 3 आरोपी गजाआड

केरळ नरबळी प्रकरण : मांसभक्षण केल्याची पोलिसांकडून पुष्टी नाही; 3 आरोपी गजाआड

Subscribe

केरळमध्ये नरबळी झाल्याची धक्कादायक घटना 27 सप्टेंबर रोजी घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अधिक तपासाला सुरूवात केली. पोलिसांच्या याप्रकरणी तपास केला असता, धक्कादायक खुलासे समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बळी देणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याने आधी 2 महिलांना बांधून पहिले टॉर्चर केले.

केरळमध्ये नरबळी झाल्याची धक्कादायक घटना 27 सप्टेंबर रोजी घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अधिक तपासाला सुरूवात केली. पोलिसांच्या याप्रकरणी तपास केला असता, धक्कादायक खुलासे समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बळी देणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याने आधी 2 महिलांना बांधून पहिले टॉर्चर केले. एका मृतदेहाचे 56 तुकडे केले आणि मृतदेह खाल्लाही. पोलिसांनी अद्याप मानवी मांस खाल्ल्याची पुष्टी केली नसली तरी पुरावे याकडे लक्ष वेधतात. आरोपींनी दोन्ही महिलांची छातीही कापल्याचे पोलिसांनी सांगितले. (kerala black magic murder case women body cut into 56 pieces dead body)

नेमकी घटना काय?

- Advertisement -

केरळमधील 2 महिलांच्या मानवी बळीचे प्रकरण मंगळवारी 11 ऑक्टोबर रोजी उघडकीस आले. ही घटना 27 सप्टेंबर रोजी घडली होती. केरळमधील त्रिरुवल्ला येथे अंधश्रद्धेमुळे डॉक्टर भगावल सिंह आणि त्याची पत्नी लैला यांनी 2 महिलांचा गळा चिरून हत्या केली होती. त्यानंतर दोन्ही मृतदेहांचे तुकडे करून दफन करण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास केला असता, त्यांना मोहम्मद शफी या तांत्रिकाने त्यांना या कामात मदत केल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना मंगळवारी अटक केली.

दरम्यान, त्रिरुवल्ला येथे राहणार डॉ. भगावल रहिवासी अनेक दिवसांपासून आर्थिक संकटाचा सामना करत होता. त्यामुळे त्याची पत्नी लैला हिने पेरुंबवूर येथे राहणाऱ्या शफी या तांत्रिकाशी संपर्क साधला. त्यावेळी त्याने मानवाचा बळी दिल्यानेच देव प्रसन्न होईल असे सांगत त्याने दोन महिलांचा बळी देण्यास सांगितले. बळीसाठी महिलांची व्यवस्था करणार असल्याचेही सांगितले. त्याने मानवी तस्करीही केली आहे. पोलिसांनी त्याला या प्रकरणात मुख्य आरोपी बनवले आहे.

- Advertisement -

लैलाने फेसबुकच्या माध्यमातून तांत्रिकाशी संपर्क साधला. शिहाब कलाडी आणि कदवंतरा येथील दोन महिलांना पैसे आणि कामाचे आमिष दाखवून त्रिरुवल्ला येथे आणले. येथून डॉक्टर दाम्पत्य महिलांना घेऊन पथनामथिट्टा येथील एलांथुर येथे घेऊन गेले. येथे तंत्र साधना करून त्यांचा बळी दिला. दोन्ही महिलांना एलांथूरमध्येच दफन करण्यात आले.

याप्रकरणी केरळच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने एनडीटीव्हीला सांगितले की, राज्यातील मानवी बलिदान प्रकरणात आरोपींनी आधी दोन्ही महिलांची हत्या केली आणि नंतर मृतदेहांची विटंबना केली. देशाला हादरवून सोडणाऱ्या या घृणास्पद घटनेच्या मुख्य आरोपीने दोन प्रयत्नांनंतर या जोडप्याला हे नरबलिदान करण्यास राजी केले. आपण हे पहिल्यांदा करत नसल्याचे त्याने त्यांना सांगितले.

कोचीचे पोलिस आयुक्त सीएच नागराजू म्हणाले की, “ज्यापर्यंत या आरोपींच्या वर्तनाचा संबंध आहे, आम्हाला समजले आहे की त्यांची पद्धत आधी खून करणे, नंतर मृतदेहाचे तुकडे करणे आणि नंतर दफन करणे. शफीने इतर दोन आरोपींनाआश्वासन दिले की पहिल्या बलिदानाने त्यांची आर्थिक स्थिती फारशी सुधारली नाही. पहिल्या बलिदानात काही ‘विधी समस्या’ होत्या, त्यामुळे त्यांना हे करावे लागले. अजून एक बलिदान द्यावे लागेल”

दरम्यान, मुख्य आरोपी मोहंमद शफी आहे. तो लैंगिक विकृत आणि कायम दुःखी राहणारा आहे. त्याने महिलांना भागवल सिंग आणि त्याची पत्नी लैला यांच्या घरी आणले. २०२० मध्ये एका ७५ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात शफी जामिनावर बाहेर होता. शफीने यापूर्वीही लैंगिक अत्याचाराचे गुन्हे केल्याचे पाेलिसांनी सांगितले.

केरळमध्ये जादूटोणासाठी मानवी बळी देण्याच्या मुद्द्यावरून देशभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. पोलिसांना पट्टणमथिट्टाचे सीसीटीव्ही फुटेज सापडले आहे. या फुटेजमध्ये नरबळी प्रकरणात पोलिसांना पहिला सुगावा सापडला. या फुटेजमध्ये आरोपी पांढऱ्या स्कॉर्पिओमध्ये चढताना दिसत असून, नंतर रस्ता ओलांडताना दिसत आहे. त्याच्यासोबत असलेली व्यक्ती मुहम्मद शफी असून, जो पोलिसांच्या म्हणण्यानुसार एजंट आहे.

पद्माच्या मोबाईल लोकेशनमुळे पोलिसांना शफीपर्यंत पोहोचणे शक्य झाले. त्यावेळी पोलिसांनी मसाज थेरपिस्ट भगवल सिंग आणि त्यांची पत्नी लैला यांना मदतीसाठी बोलावले. पोलिसांच्या माहितीनुसार, हे फुटेज 26 सप्टेंबरचे आहे, ज्या दिवशी पद्मा बेपत्ता झाली होती. रस्त्याच्या कडेला असलेल्या कॅमेऱ्यांच्या सीसीटीव्हीत ते पट्टणमथिट्टा येथील सिंग यांच्या घरी पोहोचले. 9 ऑक्टोबर रोजी, पोलिसांना त्याच्या जवळच्या शेजारी जोस थॉमसच्या घरातून सीसीटीव्ही फुटेज सापडले.


हेही वाचा – कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात ‘यलो अलर्ट’, परतीच्या पावसाने शेतीचेही नुकसान

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -