घरट्रेंडिंगआता प्री वेडिंग फोटोशूटमधून केला CAA कायद्याचा विरोध

आता प्री वेडिंग फोटोशूटमधून केला CAA कायद्याचा विरोध

Subscribe

सध्या देशात नागरिकत्व कायद्याविरोधात जोरदार आंदोलनं सुरू आहेत. मुंबईसह,बिहार,दिल्ली,नागपूर,मालेगावमध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाने हिंसक वळणही घेतलं. या काहीजणांचा मृत्यू झाला. तर काही पोलिसही जखमी झाले. प्रत्येकजण आपपल्या पद्धतीने नागरिकत्व कायद्याला विरोध करत आहेत. केरळमधील एका दाम्पत्याने तर आपल्या प्री वेडिंग फोटोशूटची थीमच या कायदयाचा आणि एनआरसीचा विरोध करणारी घेतली आहे.

अरूण गोपी आणि अशा सेखर २१ जानेवारीला लग्न करणार आहेत. लग्ना आधी या दोघांनी प्रीवेडिंग फोटोशूट केले. सध्या प्रीवेडिंग शूटची क्रेझ आहे. पण या दोघांनी केलेलं प्रीवेडींग शूटने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं. या फोटोशूट दरम्यान त्यांनी हातात NO CAA आणि NO NRC असे बोर्ड घेतले होते. हे बोर्ड घेऊन त्यांनी प्री वेडिंग शूट प्रमाणेच या कायद्यालाही विरोध केला. सध्या हे फोटोशूट सोशलमिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -