घरताज्या घडामोडीरिस्क है तो इश्क है! वर कोरोना पॉझिटिव्ह असूनही वधूने पीपीई कीट...

रिस्क है तो इश्क है! वर कोरोना पॉझिटिव्ह असूनही वधूने पीपीई कीट घालून केलं लग्न

Subscribe

‘रिस्क है तो इश्क है’ हा लोकप्रिय वेबसीरिज ‘स्कॅम १९९२ (द हर्षद मेहता स्टोअरी)’ मधला डायलॉग सगळ्यांच माहित आहे. या प्रसिद्ध डायलॉगनुसार केरळमध्ये एक रिस्की विवाह सोहळा पार पडला आहे. हा रिस्की विवाह सोहळा केरळमधल्या अलाप्पुझा येथे पार पडला. कोरोनाच्या धुमाकूळ दरम्यानच केरळमधील या विवाह सोहळ्याने लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणला. केरळच्या एका मेडिकल कॉलेजमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला वधूसह वराडी पीपीई कीट घालून उपस्थित होते. तर मेडिकल कॉलेजच्या कँपेस हा विवाह सोहळ्याचा हॉल झाला होता.

नेमके घडले काय?

नवरदेव कोरोना पॉझिटिव्ह, त्यामुळे नववधूच्या अंगावर पीपीई किट. पण कोरोनाच्या संकटातही अवघ्या काही जणांच्या साक्षीने एक आगळा वेगळा असा विवाह सोहळा पार पडला. मेडिकल कॉलेजच्या आवारातच हा विवाह सोहळा पार पडला. हॉस्पिटलमधल्या स्टाफ पीपीई कीट घालून त्यांच्या विवाह सोहळ्याचे साक्षीदार झाले होते. उपस्थितांनी दोघांचे अभिनंदन केले. कोरोनाच्या अशा कठीण संकटात अवघ्या दोन तुळशीच्या माळा एक मंगळसूत्र अशा अतिशय साध्या पद्धतीने दोघांनीही आपला विवाह उरकला. महत्वाचे म्हणजे या लग्नासाठी जिल्हाधिकाऱ्यांनीही परवानगी दिली होती. नवरदेवाला कोरोनाची लागण झालेली असतानाही एक प्रकारची रिस्क घेत दोघांनी विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

 

- Advertisement -

 

 

 

लग्नाच्या काही दिवसांपूर्वी नवरदेवा कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे नवरदेवाला अलाप्पुझा रुग्णालयात दाखल केले होते. पण ठरलेल्या तारखेनुसार लग्न होण्यासाठी नववधूने जिल्हाधिकाऱ्यांकडून लग्नासाठी परवानगी मागितली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मेडिकल कॉलेजमध्ये दोघांना लग्न करण्याची परवानगी दिली. आज (रविवारी) नववधू पीपीई किट हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि हा अनोखा विवाहसोहळा पार पडला.


हेही वाचा – Maharashtra Lockdown 2021: अवघे २ तास अन् २५ पाहुणे, लॉकडाऊनचं पहिले लग्न उरकले माहिमच्या जोडप्याने


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -