दहावीत कमी मार्क्स मिळाल्याने वडिलांनी तोडला मुलाचा पाय

किलिमनूर गावामध्ये राहणाऱ्या साबू यांच्या मुलाला परिक्षेमध्ये कमी मार्क्स मिळाले. त्यामुळे संतापलेल्या साबूने त्याच्या मुलाचा कुदळीने पाय तोडला.

father had broken his son's foot as he did not get good marks
दहावीत कमी मार्क्स मिळाल्याने वडिलांनी तोडला मुलाचा पाय

आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे त्यांनी चांगले मार्क्स पाडावे अशी सर्वच पालकांची इच्छा असते. मात्र अनेकदा पालक मुलांवर चांगले मार्क्स मिळवण्यासाठी मानसिक दडपण टाकले जाते तसंच कमी मार्क्स मिळाल्यामुळे मुलांना मारहाण सुध्दा केली जाते. अशीच एक धक्कादायक घटना केळमध्ये घडली आहे. मुलांला परिक्षेमध्ये चांगले मार्क्स पडले नाही त्यामुळे वडिलांना कुदळीने मुलाचा पाय तोडला. याप्रकरणी केरळ पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे.

सध्या देशामध्ये वार्षिक परिक्षेचे निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी मार्क्स मिळवत अव्वल स्थान मिळवले. तर अनेक विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडले. आपल्या मुलांना चांगले मार्क्स मिळावी अशी सगळ्याच पालकांची इच्छा असते. मात्र कमी मार्क्स मिळाल्यामुळे काही पालक नाराज होतात तर काही आपल्या मुलांना ओरडा देत मारतात. पण केरळमध्ये एका विद्यार्थ्याला ‘ए प्लस’ न मिळाल्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला कुदळने मारहाण केली. यामध्ये या विद्यार्थ्याचा पाय तुटला. केरळच्या किलिमनूर येथे ही घटना घडली.

केरळमध्ये ६ मे रोजी एसएसएलसी बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला. किलिमनूर गावामध्ये राहणाऱ्या साबू यांच्या मुलाला परिक्षेमध्ये कमी मार्क्स मिळाले. त्याला ‘ए प्लस’ न मिळाल्यामुळे साबू त्याच्यावर खूप चिडले. त्यांनी रागाच्या भरामध्ये आपल्या मुलाला कुदळीने बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये मुलाचा पाय तुटला. या घटनेनंतर साबूच्या पत्नीने शेजारच्यांना बोलावून आणले त्यांनी त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल गेले. साबूच्या मारहाणीत त्याच्या मुलाचा पाय तुटला. या घटनेनंतर साबू फरार झाला होता. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला कोर्टात हजर केले असता त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.