घरCORONA UPDATEऑनलाईन क्लास अटेंड करायला मिळाला नाही, तीने स्वत:ला जाळून घेतलं!

ऑनलाईन क्लास अटेंड करायला मिळाला नाही, तीने स्वत:ला जाळून घेतलं!

Subscribe

ही मुलगी गेले काही दिवस ऑनलाईन क्लासमध्ये सहभागी होऊ शकली नाही म्हणून अस्वस्थ होती.

वाढत जाणारा कोरोनाचा धोका बघता देशभर लॉकडाऊन सुरू आहे. सध्या लॉकडाऊनचा ५ वा टप्पा भारतात सुरू आहे. त्या सुरूवातीला अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद होतं. मात्र पाचव्या टप्प्यात काही नियम शिथील करण्यात आले असले तरी अद्याप शाळा, कॉलेडला परवानगी देण्यात आलेली नाहीये. त्यामुळे अनेक शाळा, क्लासेसने ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग अवलंबला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ऑनलाईन क्लासमधून धडे घेत आहेत. पण आपल्याला ऑनलाईन क्लास अटेंड करायला मिळाला नाही म्हणून एका मुलीने चक्क आत्महत्या केली आहे.

केरळमध्ये एका दहावीच्या मुलीने ऑनलाईन क्लास अटेंड करायला मिळाला नाही म्हणून स्वत:ला जाळून घेतलं आहे. घरात इंटरनेटवाला मोबाईल किंवा लॅपटॉप नसल्यामुळे ही मुलगी ऑनलाईन क्लास अटेंड करू शकली नाही. ही घटना केरळच्या मालापुर्रम जिल्ह्यात घडली आहे. या घटनेनंतर शिक्षणमंत्री सी रविंद्रनाथ यांनी या घटनेचा अहवाल मागवला आहे. पोलिसांना या मुलीचा जळलेला मृतदेह घरापासून काही अंतरावर सापडला. मुलीचे वडिल मजुर म्हणून काम करतात.

- Advertisement -

ही मुलगी गेले काही दिवस ऑनलाईन क्लासमध्ये सहभागी होऊ शकली नाही म्हणून अस्वस्थ होती. पण पोलीसांना आता जरी ही आत्महत्या वाटत असली तरी हा मर्डर नाही अशी शंका पोलिसांना आहे. सोमवारपासून या मुलीचे ऑनलाईन क्लासेस सुरू झाले. १ ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेसची सुरूवात करण्यात आली आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.


हे ही वाचा – परराज्यातून आलेल्यांना मजुरांना क्वारटाईन करणार नाही राज्याने घेतला निर्णय!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -