घरदेश-विदेशऑनलाइन बिर्याणी बेतली जीवावर; तरुणीचा मृत्यू

ऑनलाइन बिर्याणी बेतली जीवावर; तरुणीचा मृत्यू

Subscribe

अंजू श्री प्रवथी असे मृत तरुणीचे नाव आहे. मंगळूरु येथे अंजू शिक्षण घेत होती. केरळ येथील थलाकली येथे ती राहत होती. नाताळच्या सुट्टीत ती घरी आली होती. नववर्षाचे स्वागत करताना अंजूच्या कुटुंबाने ऑनलाईन बिर्याणी मागवली होती. बिर्याणी खल्ल्यानंतर अंजू व तिच्या भावाला त्रास सुरु झाला.

कासारगोडः ऑनलाइन बिर्याणी खल्ल्याने विषबाधा झालेल्या २० वर्षीय तरुणीचा शनिवारी मृत्यू झाला. या तरुणीवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तरुणीच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश अन्न सुरक्षा विभागाला देण्यात आले आहेत.

अंजू श्री प्रवथी असे मृत तरुणीचे नाव आहे. मंगळूरु येथे अंजू शिक्षण घेत होती. केरळ येथील थलाकली येथे ती राहत होती. नाताळच्या सुट्टीत ती घरी आली होती. नववर्षाचे स्वागत करताना अंजूच्या कुटुंबाने ऑनलाइन बिर्याणी मागवली होती. बिर्याणी खल्ल्यानंतर अंजू व तिच्या भावाला त्रास सुरु झाला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी अंजूची प्रकृती ढासळली. त्यामुळे तिला मंगळूरु येथील रुग्णालयात हलवण्यात आले. उपचार सुरु असताना शनिवारी पहाटे ५ वाजता तिचे निधन झाले. तिचे शव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.

- Advertisement -

अंजूच्या कुटुंबियांनी पोलिसांत याची तक्रार केली आहे. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करुन घेतली आहे. पोलीस याचा अधिक तपास करत आहे. अन्न सुरक्षा विभागाने कोचीमधील ३६ हॉटेल्सवर कारवाई केली आहे. सुरक्षा नियमांचे पालन न केल्याचा ठपका या हॉटेल्सवर ठेवण्यात आला आहे. सहा हॉटेल बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर १९ हॉटेल्सला दंड ठोठावण्यात आला आहे. आरोग्यमंत्री विणा गोर्गे यांनी अंजूच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अन्न सुरक्षा विभागाने विषबाधेमुळे झालेल्या मृत्यूची चौकशी करुन अहवाल सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.

विषबाधेमुळे मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना आहे. अंजूच्या आधी रश्मी या परिचारिकेला विषबाधा झाली होती. तिचाही विषबाधेमुळे मृत्यू झाला. ३ जानेवारीला २९ जणांना बिर्याणी खल्ल्याने त्रास झाला होता. गेल्यावर्षी २९ डिसेंबरला १०० नागरिकांना जेवणातून विषबाधा झाली होती.

- Advertisement -

विषबाधेमुळे मृत्यू झाल्याची घटना घडल्याने स्थानिक प्रशासन खडबडून जागे झाले आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. अन्न खालल्याने त्रास झाला तर त्वरीत उपचार घ्यावेत, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -