घरदेश-विदेशलॉकडाऊनमध्येही मुलगी प्रियकरासोबत फरार; वडिलांची तक्रार!

लॉकडाऊनमध्येही मुलगी प्रियकरासोबत फरार; वडिलांची तक्रार!

Subscribe

तरूणीच्या वडिलांनी तक्रार हरवल्याची केली होती, दोघांवर लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल

केरळमधील कोझिकोड जिल्ह्याजवळच्या थामारास्सेरी येथील दोन वेगवेगळ्या धर्मातील असलेलं एक जोडपं नुकतंच घरातून पळून गेल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हे जोडपं कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन असतानाही पळून गेल्याने गावात चर्चेला उधाण आले आहे. मात्र लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याबद्दल दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वयवर्ष २१ असणारी तरूणी आणि २३ वर्षाचा तरूण पळून गेल्याची घटना शनिवारी घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तक्रार हरवल्याची पण लॉकडाऊनचं उल्लंघन केल्याने गुन्हा

वेगवेगळ्या धर्माचे असल्याने तरूणीच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला होता. घरातून विरोध असल्याने या दोघांनी लॉकडाऊन असताना देखील घरातून पळ काढला होता. मात्र मुलगी घरात नसल्याने वडिलांनी आपली मुलगी हरवल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. दोघेही प्रौढ असल्याने त्यांना पोलिसांनी सोडून दिले होते. दरम्यान तरूणीच्या वडिलांनी तक्रार हरवल्याची केली होती, पण दोघांवर लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

या तरूणीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांसमोर असे म्हटले की, मी माझ्या मर्जीने माझ्या प्रियकरासोबत घरातून पळून गेली होती. मात्र लॉकडाऊनदरम्यान हे दोघं पळून गेले असल्याने लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्याने दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Corona: दारू न मिळाल्यानं जीव वेडापिसा; पठ्ठ्यानं चक्क लुटलं दुकान!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -