Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश ...अशा प्रकारे बंद कोणीही पुकारू शकत नाही, पॉप्युलर फ्रंटविरोधात केरळ उच्च न्यायालयाकडून...

…अशा प्रकारे बंद कोणीही पुकारू शकत नाही, पॉप्युलर फ्रंटविरोधात केरळ उच्च न्यायालयाकडून कारवाईचे आदेश

Subscribe

तिरुअनंतपुरम – केरळमध्ये कट्टर इस्लामी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने शुक्रवारी संप केला. केरळ बंद दरम्यान दगडफेक आणि हिंसाचाराच्या घठना घडल्या. यानंतर केरळ उच्च न्यायालयाने स्वत: घटनांची दखल घेतली असून संपावर बंदी घातली आहे.

केरळ उच्च न्यायालयाने दिले आदेश –

- Advertisement -

यावेळी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान सहन केले जाऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले आहे. अशा प्रकारे बंद कोणीही पुकारू शकत नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. संपावर बंदी घालणाऱ्या न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने राज्य प्रशासनाला दिले आहेत. कोणत्याही प्रकारचा हिंसाचार रोखण्यासाठी सर्व शक्य उपाययोजना कराव्यात, असे आदेश सरकारला दिले.

काय घडले होते –

- Advertisement -

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने शुक्रवारी संप केला. केरळ बंद दरम्यान दगडफेक आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या. यावेळी तिरुवनंतपुरम, कोल्लम, कोझिकोड, वायनाड आणि अलप्पुझा यासह विविध जिल्ह्यांमध्ये केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसवर दगडफेक झाली होती. सकाळी कन्नूरमधील नारायणपारा येथे वितरणासाठी वर्तमानपत्रे घेऊन जाणाऱ्या वाहनावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले होते.

काही जण किरकोळ जखमी –

अलाप्पुझा येथे, केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस, एक टँकर लॉरी आणि काही इतर वाहनांचे कथितपणे संपाला पाठिंबा देणाऱ्यांनी केलेल्या दगडफेकीत नुकसान झाले आहे. कोझिकोड आणि कन्नूरमध्ये पीएफआय कार्यकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीत 15 वर्षीय मुलगी आणि एक ऑटो-रिक्षा चालक किरकोळ जखमी झाला.

सरकारचे कारवाईचे आदेश –

पीएफआयने राज्यव्यापी बंद पुकारल्यानंतर केरळ पोलिसांनी राज्यात सुरक्षा वाढवली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांना सूचना दिल्या आहेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी निवेदनात म्हटले आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -