घरदेश-विदेशसनी लिओनी आणि तिच्या पतीला केरळ न्यायालयाकडून दिलासा; फसवणूक प्रकरणातील कारवाईला स्थगिती

सनी लिओनी आणि तिच्या पतीला केरळ न्यायालयाकडून दिलासा; फसवणूक प्रकरणातील कारवाईला स्थगिती

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी आणि तिचा पती डॅनियल वेबर याला केरळ उच्च न्यायालयाने बुधवारी मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने सनी आणि तिच्या पतीविरोधात फसवणुकीप्रकरणी दाखल फौजदारी गुन्ह्यास स्थगिती दिली आहे. सनीसह इतर दोघांविरुद्ध राज्य पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केलेल्या कराराच्या उल्लंघनाच्या प्रकरणातील पुढील कार्यवाहीस स्थगिती दिली. केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झियाद रहमान एए यांनी लिओनी यांच्यावरील खटला रद्द करण्याच्या मागणीसाठी केलेल्या याचिकेवर हा आदेश दिला. या याचिकेच्या सुनावणीच्या पुढील तारखेपर्यंत फौजदारी कारवाईला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

कोझिकोड येथील स्टेज परफॉर्मन्ससाठी एका कंपनीसोबत केलेल्या कराराच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने चार वर्षांपूर्वी सनी लिओनीविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. एर्नाकुलम जिल्ह्यातील कार्यक्रमाचे संयोजक शिया कुंजुमोहम्मद यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला होता, केरळ आणि परदेशात स्टेज शो करण्यासाठी 39 लाख रुपये मिळूनही लिओनी आणि इतरांनी कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप कुंजूमोहम्मदने आपल्या तक्रारीत केला होता. मात्र सनी लिओनी आणि तिच्या पतीने या आरोपांचे खंडन केले आहे.

- Advertisement -

आपला कोणत्याही गुन्ह्यात सहभाग नसल्याचा दावा त्यांनी केला. ते म्हणाले की, खटल्याच्या प्रदीर्घ प्रक्रियेमुळे त्याच्याविरुद्ध कोणतेही स्पष्ट पुरावे सापडले नाहीत, त्यामुळे दुःखी आहोत. यादरम्यान त्यांच्या कामावरही परिणाम झाला आहे.


…तर ‘या’ राज्यात लागू होईल जुनी पेन्शन योजना; काँग्रेसचे आश्वासन

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -