राष्ट्रवादीच्या माजी खासदाराला मोठ्या गुन्ह्यातून दिलासा; 10 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेला कोर्टाची स्थगिती

kerala high court suspends former lakshadweep mp mohammed faizal conviction in attempt to murder case

राष्ट्रवादी काँग्रेसच्या लक्षद्वीपमधील माजी खासदार मोहम्मद फैजल यांना खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याप्रकरणी 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. मात्र केरळ उच्च न्यायलयाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी 10 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.

या प्रकरणातून फैजल यांचा भाऊ आणि अन्य तीन दोषींना न्यायालयाने दिलासा दिला आहे. लक्षद्वीप प्रशासनाने मोहम्मद फैजल यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास विरोध केला होता, कारण असे केल्यास लोकांच्या न्याय प्रक्रियेवरील विश्वास उडेल असं मत लक्षद्वीप प्रशासनाचं होत. मात्र न्यायालयाने या शिक्षेस स्थगिती देत मोहम्मद फैजल यांना मोठा दिलासा दिला आहे.

नेमक प्रकरण काय?

राष्ट्रवादीचे माजी खासदार मोहम्मद फैजल यांनी कथितपणे लोकांच्या गटाचे नेतृत्व करत वादा घातला, या वादानंतर माजी केंद्रीय मंत्री पीएम सईद यांचे जावई आणि काँग्रेस नेते मोहम्मद सलिया यांना गंभीर मारहान करत जखमी केले, याप्रकरणी फैजल यांच्यासह इतरांविरोधात भारतीय दंड संहितेअंतर्गत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान काँग्रेस नेते मोहम्मद सलिया यांना केरळला नेण्यात आलं तिथे त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात अनेक महिने उपचार सुरु होते. या प्रकरणात एकूण 32 आरोपी होते यातील पहिल्या चार जणांना शिक्षा झाली होती. या प्रकरणातील खासदार मोहम्मद फैजल दुसरे आरोपी होते, मात्र ही किरकोळ बाचाबाची असल्याचं ठाम मत आरोपींच्या वकिलांनी मांडल आहे.


फडणवीसांच्या अटकेचा कट शरद पवारांनी रचला?; सदावर्तेंचा दावा