इराणमधील हिजाबविरोधातील आंदोलनाचे लोण पोहचले भारतात; केरळमध्ये निदर्शने आणि जाळपोळ

Kerala Muslim women group sets fire to hijabs in support of Iranian protesters

इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून सक्तीच्या हिजाब प्रकरणी सरकारविरोधात आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात आत्तापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला. त्यामुळे इराणमध्ये सध्या हिजाबला तीव्र विरोध होताना दिसतोय. मात्र इराणमधील हिजाबविरोधातील आंदोलनाचे लोण आता भारतात पोहचले आहे. केरळमध्ये सध्या हिजाबविरोधात तीव्र निदर्शने आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.

केरळमधील कोझिकोडमध्ये 9 नोव्हेंबरला (रविवारी) हिजाबची जोळपोळ करत तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी काही लोकांनी इराणधील हिजाबविरोधातील आंदोलनाचे समर्थन करत एकजुटीचा संदेश दिला. या आंदोलनात मोठ्याप्रमाणात महिलांनी सहभाग घेतला होता.

महसा अमीनीच्या मृत्यूमुळे इराणमध्ये आंदोलन

इराणमध्ये सध्या हिजाबचा मुद्दा मोठ्याप्रमाणात तापतोय. आत्तापर्यंत झालेल्या आंदोलनादरम्यान अनेकांनी आपला जीव गमावला. मात्र हा मुद्दा इराणमध्ये 22 वर्षीय महसा अमिनीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला, त्यामुळे अजूनच चिघळला. यानंतर देशभरातील लोकांनी रस्त्यावर उतरून सरकारविरोधात निदर्शने केली. महसा या तरुणीवर इस्लाम धर्माच्या ड्रेस कोडचे उल्लंघन केल्याचा आरोप होता. या आंदोलानांमुळे देशात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

इराणमध्ये हिजाबविरोधात सुरू असलेल्या आंदोलनामुळे सरकार धास्तावले आहे. राजधानी तेहरानमध्ये सुमारे एक हजार आंदोलकांवर खटला चालवण्याची तयारी सुरू आहे. सरकारी आंदोलकांवर तोडफोड, मृत सुरक्षा रक्षकांशी गैरवर्तन आणि सार्वजनिक मालमत्तेला आग लावण्याचे आरोप आहेत.

याआधी हिजाबविरोधी निदर्शने रोखण्याचे सरकारचे सर्व प्रयत्न फोल ठरले आहेत. त्यामुळे आंदोलकांचे आंदोलन अजूनही सुरूच आहे. सरकार या आंदोलनाला शत्रू देशांचे कारस्थान असल्याचा आरोप करत आहे.


मनसे ही शिवसेनेची बी टीम, भाजपच्याच नेत्याकडून मोठा आरोप