घरCORONA UPDATEकेरळमध्ये पुन्हा कोरोनाचे संकट, आठवडयाभरात ३०० पेक्षा जास्त रुग्णांची वाढ

केरळमध्ये पुन्हा कोरोनाचे संकट, आठवडयाभरात ३०० पेक्षा जास्त रुग्णांची वाढ

Subscribe

खरतर केरळ कोरोनावर नियंत्रण मिळवणारे पहिले राज्य होते. या महिन्याच्या मध्यापर्यंत केरळमध्ये परिस्थिती नियंत्रणात होती.

गेल्या आठवडाभरात केरळमध्ये पुन्हा एकदा कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झालेली दिसत आहे. मागच्या एका आठवड्यात केरळमध्ये ३०० पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. केरळमध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा वेगाने कोरोना रूग्ण्यांच्या संख्येत वाढ होत आहे.

खरतर केरळ कोरोनावर नियंत्रण मिळवणारे पहिले राज्य होते. या महिन्याच्या मध्यापर्यंत केरळमध्ये परिस्थिती नियंत्रणात होती. पण आता करेळमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची लाट आली आहे अशीच परिस्थीती दिसत आहे. केरळमध्ये ही परिस्थीती उद्भवली ती इतर राज्यातून आणि परदेशातून आलेल्या नागरिकांमुळे. यामुळे केरळमधील नियंत्रणात आलेली परिस्थिती बिघडून पुन्हा एकदा आकडा वाढला.

- Advertisement -

एका आठवड्यात दुप्पटीने वाढली संख्या

केरळमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६६६ वरुन १००३ वर पोहोचली आहे. म्हणजे रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा वेग १२ दिवसांपेक्षा कमी आहे. राष्ट्रीय स्तरावर कोरोना रुग्णांची संख्या दुप्प्ट होण्याचे प्रमाण १४ दिवस आहे.

मागच्या काही दिवसात केरळमध्ये एकाही कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली नव्हती. केरळमध्ये कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये ९० टक्केपेक्षा जास्त रूग्ण या आजारातून बरे झाले होते. त्याचप्रमाणे केरळमध्ये मृत्यूदरही सर्वात कमी आहे. केरळमध्ये लॉकडाऊनही कडक करण्यात आला होता. माज्ञ परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याची सुरुवात झाली आणि त्यानंतर निर्बंध शिथील झाले. अनेकांना त्यांच्या राज्यात परतण्याची मुभा दिली त्यानंतर केरळमध्ये पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली.

- Advertisement -

हे ही वाचा – १ जूनला मान्सूनची केरळमध्ये हजेरी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -