घरताज्या घडामोडीVideo: केरळमध्ये फुटबॉल मॅचदरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळली, 200 जण जखमी

Video: केरळमध्ये फुटबॉल मॅचदरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळली, 200 जण जखमी

Subscribe

केरळमध्ये एका लोकल फुटबॉल सामन्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. या फुटबॉल सामन्यादरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळून यात जवळपास 200 लोक जखमी झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये 15 जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आहे. या जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. 15 गंभीर जखमी असलेल्या लोकांना मंजरी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले आहे. इतर जखमींना प्राथमिक उपचार केल्यानंतर तात्काळ घरी पाठवण्यात आले आहे. केरळमधील ही दुर्घटना काल, शनिवारी रात्री घडली असून या दुर्घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

- Advertisement -

केरळच्या डिजिटल न्यूज पोर्टल मातृभूमीच्या माहितीनुसार, हा फुटबॉल सामना कलिकावूच्या पूंगोड येथील एलपी शाळेतील मैदानात होत होता. अखिल भारतीय सेव्हन्स फुटबॉल स्पर्धेचा हा अंतिम सामना होता. मलप्पुरम जिल्ह्यात ही प्रतिष्ठित फुटबॉल स्पर्धा आहे. ज्या प्रेक्षक गॅलरीमध्ये ही दुर्घटना घडली, त्यावेळेस फुटबॉल सामना पाहण्यासाठी 3000 हून जास्त लोक उपस्थित होते.

केरळमधील ही दुर्घटना जवळपास काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. लोकं दोन स्थानिक टीमचा अंतिम सामना बघण्यास पोहोचले होते. हा सामना सुरू होताच ही मोठी दुर्घटना घडली आहे. प्रेक्षक गॅलरी क्षमतेपेक्षा अधिक लोकं बसले होते. प्रेक्षकांची संख्या जवळपास 8000 असल्याची सांगितली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Pakistan Sialkot Explosion: पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये मोठे हल्ले, लष्करी तळावर लागली भीषण आग


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -