अजब! फोटोग्राफर गेला मृतदेहाचा फोटो काढायला; पण तो तर जिवंत निघाला

dead-body
महिलेचा मृतदेह (प्रातिनिधिक चित्र)

केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील कालामस्सेरी परिसरात अजब घटना समोर आली आहे. फोटोग्राफर हॉस्पिटलच्या बाहेर पोलिसांच्या कागदोपत्री कारवाईसाठी एका मृत व्यक्तीचा फोटो घेत असतानाच अचानक त्याला आवाज ऐकू येऊ लागले. त्या मृतदेहाच्या जवळ गेले असता मृतदेहातून आवाज येत असल्याने निष्पन्न झाले. आश्चर्याची बाब म्हणजे तो व्यक्ती जिवंत असल्याचे फोटोग्राफरला आढळून आले. या घटनेने सगळेच चक्रावून गेले. मात्र फोटोग्राफरमुळे एका जिवंत व्यक्तीला मृत समजून अंत्यविधी होण्यापासून त्याला वाचवण्यात आले.

फोटोग्राफर टोमी थॉमस

काय आहे घटना

फोटोग्राफर टोमी थॉमसने दिलेल्या माहितीनुसार, मृत असलेल्या सिवादासन यांच्या घरी ते पोहोचले असताना त्याच्या तोंडावर पडलेल्या अवस्थेत ते आढळून आले. बेडचा कॉर्नर लागल्यामुळे त्यांच्या डोक्यातून रक्त वाहत होते. डोक्याची जखम आणि रक्त जमा झाले होते. त्यांच्या खोलीत पुरेसा प्रकाशही नव्हता. भिंतीला असलेले लाईटचे बटन दाबण्यासाठी खाली वाकलो असता अचानक आवाज येऊ लागले. नीट कान देऊन ऐकल्यानंतर सिवादासन यांचाच तो आवाज असल्याचे समजले. ही माहिती फोटोग्राफरने त्वरीत पोलिसांना सांगितली. आम्ही सिवादासनचे शरीर सरळ केले, तेव्हा त्यांच्या हृदयाचे ठोके सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिकेतून त्यांना हॉस्पिटलमध्ये आणले. ब्लडप्रेशरच्या अटॅकमुळे ते खाली कोसळले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बेडचा कोपरा त्यांच्या डोक्याला लागल्याने जखम झाली आणि रक्त वाहू लागले. पण सुदैवाने सिवादासन यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून सांगितली गेली.

हेही वाचा –

पुणे : व्हेंटिलेटर न मिळाल्याने निवृत्त शास्त्रज्ञाचा मृत्यू