केरळ : गर्भवती हत्तीणीच्या खून प्रकरणी दोघांना अटक

एका भुकेलेल्या गर्भवती हत्तीणीला फटाकेयुक्त अननस खाला दिल्या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

kerala pregnant elephant dies after eating fire cracker fruit case two people arrested
केरळ : गर्भवती हत्तीणीच्या खून प्रकरणी दोघांना अटक

एका भुकेलेल्या गर्भवती हत्तीणीला फटाकेयुक्त अननस खाला दिल्याची अमानुष घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर अनेकांनी हे प्रकरण उचलून धरले होते. तसेच ज्या व्यक्तींनी हे कृत्य केले आहे, त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे अशी मागणी देखील केली जात होती. दरम्यान, या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री अमर प्रसाद रेड्डी यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

काय केले ट्विट?

अमर रेड्डी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, गर्भवती हत्तीणीचा खून करणाऱ्या अमजद अली आणि तमीम शेख यांना दोघांना अटक करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री पी. विजयन यांनी धर्म, जात, पंथ न बघता या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी करतो, असे देखील ते पुढे म्हणाले आहेत.

आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे

केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी गुरुवारी ट्विट केले होते. त्यात ते म्हणाले होते की, गर्भवती हत्तीणीची हत्या करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून याप्रकरणी पोलीस आणि वनविभाग संयुक्तपणे या घटनेचा तपास करत आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. त्याचप्रमाणे मारेकऱ्यांना शिक्षा करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, असे देखील ते पुढे म्हणाले होते.

तर दुसऱ्या ट्विटमध्ये मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, या घटनेप्रकरणी हत्तीणीला न्याय दिला जाणार. ज्या व्यक्तींने हे कृत्य केल आहे. त्यांना लवकरात लवकर शिक्षा दिली जाणार आहे.

नेमके काय घडले?

केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. ही हत्तीणी भुकेने त्रस्त झाली होती. त्यामुळे ती अन्नाच्या शोधात खेड्यात फिरत होती. त्याच दरम्यान, काही स्थानिक लोकांनी तिला अननसाद्वारे फाटाके खायला घातले. भुकेने व्याकुळ झालेल्या हत्तीणीने लोकांवर विश्वास ठेवत ते अननस खाल्ले आणि थोड्याच वेळात तिच्या पोटात फटाके फुटले. यातच गर्भाशयात वाढणार्‍या मुलासह तिचा मृत्यू झाला. वनविभागाच्या अधिकाऱ्याने ही वेदनादायक घटना सोशल मीडियावर पोस्ट केली आणि लगेचच त्या हत्तीणीची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि लोक चांगलेच संतापले.


हेही वाचा – कामगारांना पूर्ण वेतन देण्याच्या केंद्राच्या अधिसूचनेवर १२ जूनला निर्णय