घरदेश-विदेशकेरळमधील शाळा देणार, 'फेक न्यूज'चे धडे

केरळमधील शाळा देणार, ‘फेक न्यूज’चे धडे

Subscribe

 सूत्रांनुसार केरळच्या कान्नुर शहरातील शाळांमध्ये, 'फेक न्युज' कशी ओळखावी याचे खास प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहेत.

सोशल मीडियाच्या वाढत्या पसऱ्यामध्ये फेक न्यूजचं प्रमाणही खूप वाढलं आहे. साध्या फॅमिली व्हॉट्सअॅप ग्रुपपासून ते फेसबुक, ट्वीटरपर्यंत सगळ्याच माध्यमातून आपल्यावर फेक न्यूजचा मारा होत असतो. याच धर्तीवर केरळच्या कोन्नूर शहपरातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना फेक न्यूज ओळखण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इंटरनेटवर किंवा सोशल मीडियावर व्हायरल न्यूज कशा ओळखायच्या याविषयी शाळेतच विशेष प्रशिक्षण वर्ग भरवले जाणार आहेत. इंटरनेटवर येणाऱ्या अगणित बातम्यांमधून नेमकी फेक न्यूज कशी शोधून काढायची? याचे धडे मुलांना देण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये महाप्रलयाचं तांडव सुरु होतं. यादरम्यान व्हायरल झालेल्या ‘फेक न्यूज’नी चांगलाच गोंधळ उडवला होता. त्या फेक न्यूजमुळे केरळवासीयांच्या मदत कार्यातही अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे कोन्नूरच्या शाळांनी घेतलेला निर्णय अतिशय योग्य असल्याचं बोललं जात आहे.

BBC ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या कान्नूरच्या ६०० सरकारी शाळांपैकी १५० शाळांमध्ये हे ‘फेक न्यूज’ ओळखण्याचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहेत. सुरुवातीला मल्ल्याळम आणि इंग्रजी भाषांमध्ये हे प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे. दररोज साधारण ४० मिनीटं घेण्यात येणाऱ्या या स्पेशल क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना स्लाईड शो आणि प्रेझेंटेशनच्या माध्यमातून, फेक न्यूज ओळखण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. व्हॉट्सअॅपवर किंवा अन्य सोशल मीडियावर येणाऱ्या न्यूजमधून फेक न्यूज कशा ओळखायच्या याचं तांत्रिक ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जाईल. सध्या कोन्नूरमध्ये ‘सत्यमेव जयते’ नावाचा एक विशेष सामाजिक उपक्रम राबवला जात आहे. उपलब्ध माहितीनुसार, याच उपक्रमाअंतर्गत ‘फेक न्यूज’ ओळखण्याचा प्रशिक्षण वर्गांची योजना राबवली जात आहे.

- Advertisement -

दरम्यान फेक न्यूजमुळे पसरणारी चुकीची माहिती रोखण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकार सक्रिय झालं होतं. लोकांना विनाकरण घाबरवणाऱ्या तसंच त्यांना विचलीत करणाऱ्या फेक न्यूजवर आळा घालण्यासाठी सरकारने ‘व्हॉट्सअॅप’वर येणाऱ्या मेसेजवर निर्बंध घालावा अशी सूचना दिली होती. त्याचं पालन करत व्हॉट्सअॅपनेही ‘फॉरवडेड’ मेसेजेसवर मर्यादा लागू केली. त्यामुळे फेक न्यूज पसरण्याचं प्रमाण काही प्रमाणात नक्कीच कमी झाल्याचं बोललं जात आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -