घरट्रेंडिंगचक्क घराच्या नळातून पाणी येण्याऐवजी आली दारू!

चक्क घराच्या नळातून पाणी येण्याऐवजी आली दारू!

Subscribe

अबकारी विभागाच्या कारवाईमुळे ही समस्या उद्भवली असल्याचं उघडकीस आलं आहे.

केरळमधील थ्रिसूर जिल्ह्यातील सोलमन एवेन्यू सोसायटीमधील फ्लॅटमध्ये अचानक नळातून पाणी येण्या ऐवजी दारू येऊ लागली. तसंच पाण्याच्या टाकीमध्ये मद्य मिसळले असल्याचं देखील सर्वत्र पसरलं. त्यामुळे हे ऐकू सर्व सोसायटीमधले लोक आश्चर्यचकित झाले. त्यामुळे सोसायटीमधील तिथल्या प्रत्येक शेजाऱ्यांनी एकमेकांच्या घराची तपासणी केली. त्यावेळी १८ घरामधील नळाला दारू येत असल्याचं समजलं. तपासणी केल्यानंतर अबकारी विभागाच्या कारवाईमुळे ही समस्या उद्भवली असल्याचं समोर आलं.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अबकारी पथकाने ४५०० लीटर जप्त केलेली दारू एका खड्ड्यात टाकली होती. खड्ड्यात टाकलेली दारू जवळच्या विहिरीत जाईल यांची कल्पना पथकाला नव्हती. सोलमन एवेन्यू सोसायटीमधील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्त्रोत ही विहीर आहे. इथे राहणाऱ्या जोशी मालियेकल नावाच्या व्यक्तीने नळातून पाणी ऐवजी दुसरचं काहीतरी येताना पहिल्यांदा पाहिलं. पाईपलाईनमध्ये काहीतरी गडबड असेल असं वाटलं म्हणून त्याने ते पाणी पिलं. त्यानंतर त्याला कळलं की हे पाणी नसून दारू आहे.

- Advertisement -

जोशीने चालकुडी महानगरपालिकेशी संपर्क साधला आणि त्यांना या सर्व घटनेबाबत सांगितलं. त्यानंतर त्यांनी ज्यांच्या नळातून दारू येत आहे त्यांच्यासाठी शुद्ध पाणीपुरवठा केला. तसंच विहीर जोपर्यंत साफ होत नाही तोपर्यंत त्यांना शुद्ध पाणीपुरवठा केला जाणार असल्याचं आश्वासन दिलं. वॉर्डचे अधिकारी व्ही.जे.जोजी म्हणाले, बऱ्याचं वर्षांपासून हे कुटुंब दूषित पाणी पित होते.

आयुक्ताच्या माहितीनुसार, ही विहीर किमान आठ वेळा साफ केली आहे. विहिरीत दारूचा वास जाईपर्यंत ही विहीर साफ केली जाणार आहे. ही समस्या त्वरित दूर होईल. तसंच सर्व सोसायटीमधील मुलं आणि वृद्ध यांच्यासह सर्व सुरक्षित असतील, अशी आम्हाला आशा असल्याचं आयुक्तांनी सांगितलं.

- Advertisement -

हेही वाचा – ड्रग्जच्या दलालाची झाली गोची; पोलिसालाच पाठवलं रेटकार्ड!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -