घरक्राइमकेरळमध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मुलीवरच बलात्कार; आरोपी अटकेत

केरळमध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मुलीवरच बलात्कार; आरोपी अटकेत

Subscribe

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मुलीवर बलात्कार झाल्याची दुर्दैवी घटना केरळमध्ये घडली आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेत नेले. त्यावेळी रुग्णवाहिकेतील वॉर्डबॉयने संबंधीत महिलेवर बलात्कार केला.

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मुलीवर बलात्कार झाल्याची दुर्दैवी घटना केरळमध्ये घडली आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेत नेले. त्यावेळी रुग्णवाहिकेतील वॉर्डबॉयने संबंधीत महिलेवर बलात्कार केला. महिलेला त्रिशूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात येत असताना ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित वॉर्डबॉयला अटक केली आहे. (kerala thrissur woman sexually assaulted in ambulance after suicide attempt)

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. महिलेने विष प्राशन केल्याचे समजताच नातेवाईकांनी तिला तातडीने कोडुंगल्लूर रुग्णालयात दाखल केले. मात्र, या रुग्णालयात तिच्या तब्येतीत सुधारणा होत नसल्याने महिलेला त्रिशूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी कोडुंगल्लूर रुग्णालयातून वैद्यकीय महाविद्यालयात स्थलांतरित होत असताना रुग्णालयातील दयालाल नावाच्या वॉर्डबॉयला रुग्णवाहिकेत सोबत येण्यास सांगितले. त्यावेळी दयालालने रुग्णवाहिकेत महिलेवर बलात्कार केला.

- Advertisement -

या बलात्काराच्या घटनेनंतर पीडितेने सुरुवातीला नर्सला हा प्रकार सांगितला. त्यानंतर डॉक्टरांना माहिती दिली. त्यानंतर रुग्णालयातच पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोडुंगल्लूर रुग्णालयातील कर्मचाऱ्याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्रिशूल मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केल्यानंतर या पीडितेने डॉक्टरांना घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करत आरोपीला अटक केली.

याप्रकरणी आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी रुग्णालयाच्या अधीक्षकांकडून अहवाल मागवला आहे. अटकेसोबतच आरोपी दयालालला तत्काळ प्रभावाने नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. तो कंत्राटी तत्वावर काम करत होता.

- Advertisement -

अशीच एक घटना दोन वर्षांपूर्वी कोट्टयम येथे घडली होती. एका रुग्णवाहिका चालकाने कोरोनाग्रस्त मुलीवर बलात्कार केला. त्यानंतरच महिला रुग्णांना एकटीने रुग्णालयात नेले जाणार नाही. त्यांच्यासोबत एक आरोग्य कर्मचारीही असेल, असा आदेश सरकारने काढला होता. आरोपींनी यापूर्वीही अशा काही घटना घडवून आणल्याचा पोलिसांचा संशय असून, त्याचा तपास सुरू आहे.


हेही वाचा – पंतप्रधान मोदी 10 फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर; पोलीस अलर्ट मोडवर तर, ‘या’ गोष्टींवर असणार बंदी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -