घर देश-विदेश Kerala : शालेय अभ्यासक्रमात गांधी हत्या आणि गुजरात दंगलींसारखे विषय पुन्हा जोडले

Kerala : शालेय अभ्यासक्रमात गांधी हत्या आणि गुजरात दंगलींसारखे विषय पुन्हा जोडले

Subscribe

Kerala : केरळमध्ये (Kerala) शालेय अभ्यासक्रमात (School Curriculum) महात्मा गांधींची हत्या (Assassination of Mahatma Gandhi) आणि गुजरात दंगलींसारखे (Gujarat riots) विषय (Subjet) समाविष्ट करण्यात आले आहेत. या दोन्ही घटना स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंगच्या (NCERT) पुस्तकातून वगळण्यात आल्या होत्या. मात्र केरळ सरकाराकडून शालेय अभ्यासक्रमात या घटना पुन्हा एकदा जोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे केरळ राज्यातील मुलांना हे विषय आता शिकवण्यात येणार आहेत. (Kerala Topics like Gandhi’s assassination and Gujarat riots re emerged in the school curriculum)

महात्मा गांधींची हत्या आणि गुजरात दंगलींसारखे घटना जोडून पुस्तके तयार करण्यात आली आहेत. सप्टेंबरपासून ही पुस्तके मुलांना त्यांच्या अभ्यासासाठी वाटली जाणार आहेत. एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमधून काढून टाकलेल्या अभ्यासक्रमाचा समावेश करणारी नवीन पाठ्यपुस्तके केरळमधील शाळांमध्ये उपलब्ध करून दिली जातील, असे शिक्षण मंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी सांगितले. ओणमच्या सुट्टीनंतर शाळा पुन्हा सुरू झाल्यावर ही पुस्तके मुलांना दिली जातील, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – किंग कोण? नरेंद्र मोदी की राहुल गांधी… भाजप आणि काँग्रेसमध्ये दावे- प्रतिदावे

व्ही. शिवनकुट्टी म्हणाले की, जेव्हा एनसीईआर्टीने पुस्तकांमध्ये सुधारणा केली, तेव्हा शालेय पाठ्यपुस्तकातून काही घटनांचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे पाठ्यपुस्तकांमधून काढून टाकलेल्या महात्मा गांधींची हत्या, नेहरूंच्या काळात झालेल्या प्रशासकीय सुधारणा आणि गुजरात दंगलींसारख्या घटनांचा पुन्हा एकदा समावेश करण्यात आला आहे.

ओणमच्या सुट्टीनंतर पुस्तके होतील उपलब्ध 

- Advertisement -

व्ही. शिवनकुट्टी म्हणाले की, शालेय अभ्यासक्रम समितीने यासंदर्भात चर्चा केल्यानंतर समाविष्ट न केलेल्या घटनांना शाळांमध्ये शिकवले जावेत, अशी शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार नवीन पाठ्यपुस्तके आता तयार झाली असून ओणमच्या सुट्टीनंतर विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून दिली जातील. परीक्षेतही या घटनांवर प्रश्न विचारले जातील, असेही व्ही. शिवनकुट्टी यांनी सांगितले.

हेही वाचा – Chandrayan : भारतापाठोपाठ ‘या’ देशानेही पाठविले चंद्रावर यान; म्हणे चंद्रावर शोधणार पाणी

इतिहास आणि विज्ञानात बदल

विद्यार्थ्यांनी आपला इतिहास, अर्थशास्त्र आणि विज्ञान योग्य दृष्टिकोनातून शिकणे आवश्यक आहे. केंद्राने अशा सर्व घटना काढून टाकल्या होत्या. मात्र पिनाराई विजयन सरकारने यापूर्वी आश्वासन दिले होते की, विद्यार्थ्यांना देशाच्या वास्तविक आत्म्याबद्दल शिकवले जाईल, त्यानुसार गांधींची हत्या, नेहरूंच्या काळात झालेल्या प्रशासकीय सुधारणा आणि गुजरात दंगलींसारख्या घटनांचा पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आलेला आहे, असे व्ही. शिवनकुट्टी यांनी सांगितले.

एनसीईआरटीच्या पुस्तकांव्यतिरिक्त छापली विवादित घटनांची पुस्तके

केरळच्या एससीईआरटीने 11वी आणि 12वीच्या इतिहास आणि राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात बदल केले आहेत. विशेष बाब म्हणजे एनसीआर्टीने अभ्यासक्रमातून वगळलेल्या घटनांचा केरळच्या शिक्षण विभागाने पाठ्यपुस्तकात समावेश केला आहे. त्यामुळे विवादित घटना केरळमधील शाळांमध्ये आता शिकवले जाणार आहेत. मात्र, ही पुस्तके एनसीईआरटीच्या पुस्तकांव्यतिरिक्त इतर शाळांमध्ये दिली जातील आणि विद्यार्थ्यांना शिकवली जातील.

- Advertisment -