घरताज्या घडामोडी'अनुराधा पौडवाल माझी आई, मला हवी ५० कोटींची नुकसान भरपाई'

‘अनुराधा पौडवाल माझी आई, मला हवी ५० कोटींची नुकसान भरपाई’

Subscribe

केरळमधील एका महिलेने प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल या माझ्या आई आहेत, असा दावा केला असून तिने ५० कोटींची नुकसान भरपाईचीही मागणी केली आहे.

केरळमधील एका महिलेने प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल या माझ्या आई आहेत, असा दावा केला आहे. तसेच या महिलेने पौडवाल यांच्याविरोधात थिरुवनंतपुरम जिल्हा कौटुंबिक न्यायालयात खटला दाखल कोला असून तिने ५० कोटींची नुकसान भरपाईचीही मागणी केली आहे.

काय म्हणाली ही महिला

केरळमध्ये राहणारी कर्मा मॉडेक्स असे या महिलेचे नाव आहे. तिला एका दाम्पत्याने चार दिवसांची होती त्यावेळी दत्तक घेतले होते, अशी माहिती कर्माच्या वडिलांनी तिला आपल्या मृत्यूपूर्वी सांगितली होती. तसेच ती अनुराधा पौडवाल यांची मुलगी असल्याचे देखील सांगितले होते. ‘अनुराधा पौडवाल यांनी मी अवघ्या चार दिवसांची असताना मला दुसऱ्या दामपत्याला दत्तक दिले होते. त्यांना त्यादरम्यान त्यांच्या करिअरकडे लक्ष द्यायचे होते. त्यामुळे त्यांनी माझा सांभाळ केला नाही’, असा दावा देखील त्या महिलेने केला आहे.

- Advertisement -

५० कोटींच नुकसान भरपाई

दरम्यान, पौडवाल यांनी तिला सांभाळले नाही, असा आरोप केला आहे. तसेच त्यांच्याकडे ५० कोटी रुपयांची नुकसान भरपाई देखील मागितली आहे. तसेच माझा दावा सिद्ध करण्यासाठी मी डिएनए चाचणी करायला देखील तयार आहे. जर सिद्ध झाले तर त्यांनी मला ५० कोटी रुपये द्यावे. तसेच पौडवाल यांचे पती अरुण पौडवाल यांच्या संपत्तीतील माझा हिस्सा द्यावा’, असा दावा देखील केला आहे.


हेही वाचा – लोकसभेत प्रश्न विचारण्यात सुप्रिया सुळेंनी मारली बाजी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -