Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश KERLA BOMB : देशी बनावटीचे 8 बॉम्ब सापडले, केरळमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला

KERLA BOMB : देशी बनावटीचे 8 बॉम्ब सापडले, केरळमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला

Subscribe

नवी दिल्ली : केरळमध्ये पोत्यात भरुन ठेवलेले उच्च क्षमतेचे देसी बनावटीचे 8 बॉम्ब सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.  एवढ्या मोठ्या प्रमाणात बॉम्ब सापड्लयामुळे दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट होता, असे स्पष्ट निर्देश मिळत आहेत. पण बॉम्ब स्कॉडने बॉम्ब आधीच निकामी केल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. (8 country-made bombs found in Kerala)

- Advertisement -

पोलिसांच्या माहितीनुसार, ८ देसी बनावटीचे बॉम्ब केरळमधील किझ्झकल याठिकाणी आढळून आले आहेत. कन्नूर जिल्ह्यातील कन्नवम पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार समोर आला आहे. पाण्याच्या मोठा पाईपमध्ये एका पोत्यामध्ये हे बॉम्ब सापडले आहेत. बॉम्ब शोधक पथकाने बॉम्ब निकामी केले आहेत. याप्रकरणी कन्नवम पोलीस ठाण्यात अज्ञांताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कन्नवम पोलीस स्टेशनमधील उपनिरीक्षक सतीशन व्ही. यांनी ही माहिती दिली आहे.

उपराष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्ह्यात सखोल शोधमोहीम सुरू केली होती. त्या दरम्यान हे बॉम्ब जप्त करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी बॉम्ब सुरक्षित स्थळी हलवून निकामी केले. संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. मात्र येथे बॉम्ब कोणी पेरला हे स्पष्ट झालेले नाही. याशिवाय पोलिसांना घटनास्थळावरून दुसरे काही सापडले नाही.

- Advertisement -

एका घरावर क्रूड बॉम्ब फेकण्यात आला होता
केरळमधील कुन्नूर जिल्ह्यात १३ मे रोजी मध्यरात्री एका घरावर क्रूड बॉम्ब फेकण्यात आला होता. या बॉम्ह हल्ल्यामुळे घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास करत आहेत. याआधीही याचवर्षी कन्नूरमध्ये १२ जानेवारीला थलासेरी भागात एका घरात बॉम्बस्फोट झाल्यामुळे एक तरुण गंभीर जखमी झाला होता. या ठिकाणी एकापेक्षा जास्त बॉम्ब असल्याची शक्यता कन्नूर पोलिसांनी व्यक्त केली होती. पोलिसांनी सांगितले की, जखमी व्यक्तीने क्रूड बॉम्ब बनवण्याचा इतिहास आहे. घरात ठेवलेल्या बॉम्बचा उष्णतेमुळे स्फोट झाल्याची भीती पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली होती. तसेच जखमी व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisment -