घरताज्या घडामोडीCoronavirus: केरळ उभारणार करोना केअर होम्स

Coronavirus: केरळ उभारणार करोना केअर होम्स

Subscribe

या करोना केअर होम्समध्ये मेडिकलचे विद्यार्थी आणि आरोग्य स्वयंसेवक दाखल करण्यात येतील आणि खासगी डॉक्टरांचीही मदत घेतली जाईल.

करोनाने केरळमध्ये शिरकाव केल्यानंतर करोनाचा सामना करण्यासाठी नवा निर्णय घेतला आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चार आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘करोना केअर होम’ उघडणार आहे. बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांच्या हालचालींवर लक्ष ठेवायला सोपं जाईल तसेच चांगल्या पद्धतीने क्वॉरंटाईन करता येईल, असे केरळ सरकारने म्हटले आहे.

आम्ही सध्या गंभीर टप्प्यात प्रवेश करत आहोत. त्यामुळे आम्हाला अधिक काळजी तसेच सतर्क रहावे लागणार आहे. काही जण घरी क्वॉरंटाईन झाले मात्र अनेकांच्या संपर्कात आले आहेत. या लोकांनी आमचे नियोजन, राज्य सरकारच्या आदेशांचे पालन केले नाही. खरतर ही सामाजिक जबाबदारी आहे आणि सर्वांनी सरकारने दिलेल आदेश पाळावे, असे केरळचे मुख्यमंत्री पीनारायी विजयन यांनी आवाहन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी राज्याच्या राजधानीत वैद्यकीय तज्ज्ञ, वैज्ञानिक आणि आरोग्य कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली.

- Advertisement -

हेही वाचा – उद्यापासून ‘या’ तीन ठिकाणी होणार करोनाची चाचणी

होम क्वॉरंटाईन सुरक्षित नाही आहे. जगातील विविध भागातून मोठ्या संख्येने लोक परत येत असल्याने आम्हाला अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. संबंधित जिल्हा प्रशासनाने केअर होमसाठी विमानतळ बाहेरील जागा शोधून काढली आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री के.के. शैलजा म्हणाल्या. केरळमध्ये तिरुअनंतपुरम, कोचीन, कोझिकोड आणि कन्नूर अशी चार आंतरराष्ट्रीय विमानतळांजवळ करोना होम केअर उभारणार आहेत. या करोना केअर होम्समध्ये मेडिकलचे विद्यार्थी आणि आरोग्य स्वयंसेवक दाखल करण्यात येतील आणि खासगी डॉक्टरांचीही मदत घेतली जाईल.

राज्य आरोग्य मंत्रालयाने अलीकडेच अलगीकरण वॉर्डमध्ये दाखल झालेल्यांचे फूड मेन्यू जाहीर केले आहे. मंगळवारी त्यांना चटणी, सांभर, उकडलेले अंडे, संत्रे आणि एक लिटर पाणी न्याहरीसाठी देण्यात येणार आहे. सकाळी १०.३० वाजता संत्र्याचा रस; दुपारच्या जेवणात भात, फिश करी, ‘थोरान’, दही आणि पापड; संध्याकाळी बिस्किट किंवा वडा आणि रात्री अ‍ॅपम आणि केळी, एक लिटर पाणी आणि शिजवलेल्या भाज्या. तसेच परदेशी लोकांना मांसाहारी पदार्थ देण्यात आले आहेत. केअर होम्समध्येही आम्ही खाद्यपदार्थाचा दर्जा राखू, असे त्या म्हणाल्या.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -